TheClearNews.Com
Wednesday, December 10, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावची पाणी समस्या आता पंतप्रधान, राष्ट्रपतींसह मुख्यमंत्री आणि राज्यपालांपर्यंत पोहचणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) मागील अनेक वर्षापासून शहरातील पाणी समस्या कायम आहे. अनेक निवडणुका पाणी समस्येवर लढल्या गेल्यात. पण अद्यापही धरणगावकर तहानलेलेच आहे. धरणगावातील पाणी समस्या सोडवण्यासाठी धरणगाव जन जागृत मंचची स्थापना होत असून सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील आणि जितेंद्र महाजन हे मैदानात उतरले आहेत. अगदी शिवराम पाटील यांनी धरणगावची पाणी समस्या पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्यासह मुख्यमंत्री आणि राज्यपालांपर्यंत पोहचवली जाईल, अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियात टाकून खळबळ उडवून दिली आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 10 डिसेंबर 2025 !

जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांची पोस्ट जशीच्या तशी

 

झिम झिम पाणी दे !

 

पाणी हे जिवनाश्यक आहे. दैनंदिन वापर होतो आणि म्हणूनच अन्न व आरोग्य इतकेच पाणीपुरवठ्याला सरकारने महत्त्व दिले आहे. म्हणून स्वतंत्र पाणीपुरवठा खाते बनवले आहे. पाणी पुरवठ्यासाठी कधीही पैसा कमी पडू न देण्याचे सरकारचे धोरण आहे. धरण बांधून, बोअरवेल करून, विहीरी खोदून,नदीवरून, तलाव बांधून अशा अनेक प्रकारे पाणीपुरवठा केला जातो. तरीही शक्य होत नसेल तर टँकरने,रेल्वेने पाणी पुरवठा केला जातो. तरीही धरणगाव शहर वंचित का?. जवळच अंजनी,गिरणा, तापी नदी भरभरून वाहते आणि धरणगाव कोरडे कसे, काय?. करणे असतील? याचा शोध घेणे आवश्यक आहे.

 

धरणगाव फक्त सत्तर हजारंचे गाव. कारखाना नाही. पाणीवर उद्योग नाही. तरीसुद्धा पाण्याची कमी का?. सरकारकडे पैसा नाही का?.पैसा असून नियोजन नाही का?.नियोजन फेल गेले का?. ईच्छाशक्ती नाही का?.लोक जागृत नाहीत का?. मागणी योग्य ठिकाणी पोहचत नाही का?. यापैकी किंवा आणखी काही कारणे असतीलच. ती कारणे शोधण्यास प्रस्थापित नेते व नगरपालिका अपयशी ठरलेली आहे का? असा संशय नागरिकांमध्ये बळावतो आहे.

 

आम्हाला असे वाटते की, पाण्याची मागणी योग्य ठिकाणी पोहचलीच नाही. म्हणून कोणी दखल घेतली नसावी. पाणीचा प्रश्न नगरपालिका,जिल्हा,मंत्री इथंपर्यंत पोहचली. पण उपयोग झाला नाही. म्हणून ही मागणी मुख्यमंत्री व राज्यपालांपर्यंत पोहचली पाहिजे. प्रधानमंत्री, राष्ट्रपतीपर्यंत पोहचवली पाहिजे. जर नगरपालिका, आमदार, मंत्री, जिल्हा नियोजन हे एकाच हाती असेल तर दुसऱ्या तिसऱ्याला तेथे शिरकाव करण्याचा, हस्तक्षेप करण्याचा आधिकार नसतो. आधिकार लोकशाही किंवा वैधानिक असला तरी वाव नसतो. म्हणून जेथे आधिकार चिरडला जात असेल तेथे वारंवार अपील करण्यापेक्षा जेथे ऐकले जाईल, विचार होईल, पुरवठा होईल तेथे पोहचवला पाहिजे. लोकशाही शासन प्रणालीमध्ये असे अनेक स्तर आहेत. तिथंपर्यंत आम्ही पोहचतच नाही. कारणे आहेत. जे समोर दिसते तेच सरकार समोर दिसते. तोच देव समजून आम्ही तेथेच थांबतो. आणि त्या देवालाही तेच हवे असते. आगे पिछे, उपर निचे हमारी सरकार. हम है यहांके राजकुमार…खबरदार !

 

धरणगाव शहरात बुद्धिमान, शिक्षीत लोकांची संख्या खूप मोठी आहे. पण दगदग न सोसवणाऱ्यांचीही संख्या खूप मोठी आहे. विरोधकांची तर त्यापेक्षा जास्त. आपण बुद्धिमान व शिक्षीत लोकांना सोबत घेऊन विरोधकांना वळसा घेऊन योग्य ठिकाणी मागणी पोहचवणार आहोत. लोकशाहीच्या सात स्तरांवर एकतरी स्तरावर पाण्याची मागणीची दखल घेतली जाईल, असा आमचा विश्वास आहे. जर शेवटच्या स्तरावरही दखल घेतली गेली नाही. तर आम्ही पावसाळ्यात पडणारे देवाचे पाणी जेवणाच्या ताटात झेलून तहान भागवू.

 

झिम झिम पाणी दे !
आमची तहान भागू दे !

– शिवराम पाटील
9270963122
महाराष्ट्र जागृत जनमंच

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope: आजचे राशीभविष्य 10 डिसेंबर 2025 !

December 10, 2025
धरणगाव

जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

December 9, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 डिसेंबर 2025 !

December 9, 2025
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 8 डिसेंबर 2025 !

December 8, 2025
जळगाव

रचना कॉलनीत श्रीमद् भागवत कथेच्या सप्ताहातून भक्तांना मिळाला भक्तिभावाचा अमृतानुभव

December 7, 2025
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 7 ते 13 डिसेंबर 2025 !

December 7, 2025
Next Post

King Billy Spieltempel: 1 000 Rabatt & 200 Freespins!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : प्रेमभंगातून तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

December 23, 2021

चोरट्यांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली !

May 9, 2025

धरणगाव येथे सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रदीप देसलेंचे शिवजयंती निमित्ताने उद्या जाहीर व्याख्यान

February 21, 2025

अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

March 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group