पाळधी ता. धरणगाव (शहाबाज देशपांडे) येथील देशमुख वाड्यात रमजान ईद निमित्त सर्व धर्मियांसाठी आयोजित शिरखुरमा कार्यक्रमात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गावात एकी ठेवा किरकोळ वादातून गावाची एकी भंग होईल असे काम करु नका असे आवाहन केले.
येथील देशमुख वाड्यात माजी सरपंच आलिम देशमुख व त्यांच्या मित्र परीवारातर्फे रमजान ईद निमित्त शिरखूर्मा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सरपंच आलीम देशमुख यांनी प्रास्तविकात सर्व जाती धर्माचा लोकांनी एकत्र राहून गावात शांतता नांदावी या साठी प्रयत्न करावे, असे आव्हान केले. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते व त्यात सर्व धर्मीय नागरिक सहभागी होऊन गावातील एकीचे प्रदर्शन करतात असे सांगितले.
यावेळी बोलताना पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी गावाची एकी महत्वाची असून बाहेरील काही जण यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गावात होणारे किरकोळ वादातून गावाची शांतता भंग होऊ देऊ नका असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सरपंच विजय पाटील, शरद कोळी, उद्योगपती शरद कासट, दिलीप पाटील, झवर विद्यालयाचे अध्यक्ष विजय झवर, पाळधी पोलीस चौकीचे स. पो. नि. प्रशांत कंडारे आदी उपस्थित होते. जि.प सदस्य प्रतापराव पाटील देशदूतचे संपादक अलोने नाना , विजय महाजन कार्यक्रमास सावखा पठाण, नईम देशपांडे, सलिम खान, पंढरीनाथ ठाकूर, अरुण पाटील, डॉ. राजू देशमुख, डॉ. परवेज देशपांडे, कालू खाटीक, अनील सोमाणी, श्रीकृष्ण साळुंखे, पत्रकार मुन्ना झवर, दिपक झवर, गोपाल सोनवणे, दिपक श्रीखंडे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन भुषण महाजन यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देशमुख वाड्यातील सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले.














