पुणे (वृत्तसंस्था) नरेंद्र मोदींनी २०१४ मध्येच सांगितले होते, कोणाचाही कार्यकर्ता असु दे. कोणाचीही चुक माफ केली जाणार नाही. ईडी त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे. शेवटी चुकीला माफी नाही, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
काल सकाळी दहा-अकराच्या सुमारास अचानक ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर, अधिकाऱ्यांनी तब्बल १३ तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. त्यानंतर अखेर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली. मागच्या अनेक दिवसांपासून ते ईडीसमोर हजर होण्यासाठी टाळाटाळ करत होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही चौकशीसाठी हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी अचानक ईडी कार्यालयात हजर झाले.या कारवाईवर विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून आज अगदी सकाळी सकाळी पुण्यात चंद्रकांत पाटील यांनीही अनिल देशमुख यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कुणाचाही कार्यकर्ता असु दे. कुणाचीही चुक माफ केली जाणार नाही, असं नरेंद्र मोदींनी २०१४ ला सांगितलं होतं. देशातून राज्या-राज्यांतून भ्रष्टाचाराला हद्दपार करायचंय. देशमुखांच्या बाबतीत शेवटी हे व्हायच तेच झालं. ईडीने अनेक वेळा समन्स देऊनही ते हजर राहिले नाही. ईडीने त्यांना पुरासा वेळ दिला. आता ईडीने अटकेची कारवाई केलीय. ईडी त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे. शेवटी चुकीला माफी नाही’.