नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सामान्यतः बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवर्थीमुळे हृदयविकाराची समस्या उद्भवते. यामुळेच देशातील चारपैकी तीन जणांना हृदयविकाराचा झटका येतो. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की बहुतेक लोकांना अनेकदा सायलेंट अॅटॅक देखील येतात. परंतु त्यांना ते माहित नसते. हृदयाचे स्नायू योग्य वेळी काम करत नसतील तर मोठी समस्या उद्भवू शकते. हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी काही लक्षणं (Heart attack Symptoms) दिसू लागतात. ती वेळीच ओळखली तर धोका टाळता येतो.
हार्ट अटॅक येण्याअगोदर बहुतांश अशी लक्षणं दिसतात
छातीत दुखणे, दाब आणि अस्वस्थता या गोष्टी काहीवेळा हृदयविकाराच्या झटक्यामध्ये तीव्र स्वरुपात जाणवतात, या लक्षणांवर आपण ओळखू शकतो. काहींच्या छातीच्या मध्यभागी फक्त थोडी वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. यामुळे तुम्हाला थोडासा दबाव आणि अस्वस्थता देखील जाणवू शकते. जेव्हा ही लक्षणे दिसतात तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, जी नंतर धोकादायक बनतात.
हृदयविकाराचे सामान्य लक्षण
जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा अचानक चक्कर येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नये. तुम्हाला छातीत दुखण्यासोबत किंवा त्याशिवाय श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि हे हृदयविकाराचे सामान्य लक्षण आहे. तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा तुम्ही बेशुद्ध होऊ शकता. थंड घाम येणं, मळमळणे ही देखील हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असू शकतात. तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारे अस्वस्थ वाटत असल्यास हृदयविकाराचा झटका टाळण्याचा सर्वांत चांगला मार्ग म्हणजे तुमच्या हृदयाची तपासणी करणे.
तर अनेकांचे प्राण वाचू शकतात
हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे लवकर ध्यानात आल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अस्वस्थ वाटणं, छातीत अस्वस्थता, छातीत जडपणा, छातीत दुखणे, घाम येणे, धाप लागणे यांचा समावेश होतो. याशिवाय काहींना अॅसिडीटी किंवा ढेकर येण्याचा प्रकारही होतो.