जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीयाने विजय मिळविला आहे. अंजली यास उमेदवारीवरून मोठा गोंधळ उडाला होता मात्र, न्यायालयाने अंजलीची उमेदवारी कायम राखली होती.
तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीयाने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतू तृतीयपंथीय असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, असे कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, आता अंजली पाटील या तृतीयपंथीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला असून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अंजली पाटील यांन स्त्री राखीव प्रवर्गातील उमेदवारी करण्याची परवानगी दिली होती.
















