मेष : कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे राहिल. तुम्हाला काम करणे अत्यंत गरजेचे आहे. आपले मनोबल उत्तम राहील. काहींना आज अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आज तुमच्या मनाला शांती मिळेल. नोकरीमध्ये आज तुमच्यावरील काही ओझे कमी होऊ शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन संधी प्राप्त होईल. नवा मार्ग दिसेल. खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळा. दिवस संमिश्र फलदायी. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.
वृषभ : तुम्हाला आज चांगली बातमी मिळणार आहे. तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. आज समाजात मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपल्याला अनुकूल असणार आहे. मध्यवर्ती भूमिका स्वीकारताना काळजी घ्या. वैचारिक गुंतागुंत टाळावी. जमिनीच्या कामात लाभ संभवतो.
मिथुन : तुमचा दिवस आनंदात जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. बढती शक्यता आहे. आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. वैवाहिक जीवनातील मतभेद कमी होतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. जीवनसाथीकडून सहकार्य आणि लाभ मिळेल. तुमच्या कामाचा व तुमच्या विचारांचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. प्रवास सुखकर होतील. सावध पवित्रा घ्यावा. संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत.
कर्क : उतावीळपणा आणि भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. भविष्यात तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. मानसिक अस्वस्थता राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत, तर काहींना एखादा नकारात्मक अनुभव येण्याची शक्यता आहे. आज पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्यासाठी चांगला दिवस आहे. विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो. शांत राहावे. विनाकारण तोंडसुख नको. भावनिक ताण घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल.
सिंह : आज अनेक समस्या डोके वर काढतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. अनेकांशी सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील. प्रियजनांशी तुमची असणारी जवळीक वाढेल. राजकारणातील लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार फळ मिळणार आहे. आर्थिक कामांसाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. आर्थिक बचतीवर लक्ष ठेवा. खाजगी समस्या सामंजस्याने सोडवाल. कामे झपाट्याने पार पाडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
कन्या : अनेक दिवसांपासून सुरु असलेली समस्या आज संपेल. तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सार्वजनिक कामात सहभागी होणार आहात. मान-सन्मान लाभेल. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आवडत्या कामासाठी वेळ मिळेल. लहान मुलांकडून नवीन काहीतरी शिकायला मिळेल.
तुळ : उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. कामाचा थकवा जाणवेल त्यामुळे आरोग्यावर परिणाम होईल. काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवणार आहात. आज विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुमचे मनोबल उंचावणारी एखादी घटना घडेल. कौटुंबिक वादळ संयमाने सोडवावे. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. भागीदाराची बाजू समजून घ्या.
वृश्चिक : एखाद्या अडचणीत सापडलेल्या मित्राला मदत करण्याचा विचार कराल. जवळच्या व्यक्तीला भेटल्याने आनंदी व्हाल. नकरात्मकता जाणवेल. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. काहींना आज एखाद्या गोष्टीमध्ये अनावश्यक मनस्ताप संभवतो. कामाचा ताण व दगदग जाणवेल. आज तुमचे अडकलेले पैसे मिळणार आहे. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. दैनंदिन कामास विलंब लागणार आहे. काही निकष ठरवावे लागतील. शेजार्यांना मदत कराल. कामात कुचराई करू नका. गुंतवणूक करताना सावध राहावे.
धनु : भौतिक सुखसोयींचा लाभ घेऊ शकतात. पैशांची देवाणघेवाण करु नका. कोर्टातील प्रकरणासाठी आज फेऱ्या माराव्या लागतील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे विनासायास पार पडणार आहेत. तुमचे आरोग्य उत्तम राहील. आज तुम्हाला आवश्यक गोष्टींवर पैसे खर्च करावे लागतील. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील. गरज समजून कामे हाती घ्या. घरातील वातावरणाकडे लक्ष ठेवा. अनावश्यक खर्च टाळावा. मानसिक शांतता लाभेल.
मकर : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. तुमच्यावर अनावश्यक ताण राहील. आज नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. वादविवादात सहभाग टाळावा. प्रवास आज नकोत. वादाचे मुद्दे समोर आणू नका. भावंडांना समजून घ्यावे लागेल. शक्यतो प्रवास टाळलेलाच बरा.
कुंभ : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. भविष्यात अडचणींचा सामना करावा लागेल. मुलांशी संबंधित निर्णय घ्याल. प्रियजनांशी जवळीक वाढेल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभणार आहे. नवीन मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल तर कायदेशीर बाबी तपासून पाहा. आर्थिक कामांकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. अवाजवी खर्च वाढतील. उगाचच सढळ हाताचा वापर करू नका. जुन्या आठवणी दाटून येतील. संध्याकाळी बाहेर जाणे टाळावे.
मीन : व्यवसायात वाढत्या यशामुळे आनंदी व्हाल. परदेशात प्रवास करु शकता. पालकांचा सल्ला आज तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्ही आज विशेष आनंदी राहणार आहात. तुम्हाला जाणवत असणाऱ्या चिंता कमी होतील. मानसिक आणि बौद्धिक ओझ्यातून सुटका होईल. गुंतवणूक केल्याने भविष्यात फायदा होऊ शकतो. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मुलांना अभ्यासात मदत कराल. काटकसर करावी लागू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो.