मेष : उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखावे लागेल. भविष्यात आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आज रोजगारच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. आनंदी राहणार आहात. जुन्या कामांमधून यश मिळेल. घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.
वृषभ : व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होईल. जुन्या मित्राचा सल्ला उपयोगी ठरेल. जिद्द वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. अनुकूलता प्राप्त होईल. एखादा भाग्यकारक अनुभव येईल. आज तुम्ही व्यवसायात कोणत्या नवीन योजना आखात असाल तर पूर्ण होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभेल. सामाजिक मुद्यात लक्ष घालू नका. अपेक्षित उत्तर मिळेल. नवीन ओळखीतून लाभ होईल. अप्रिय व्यक्तीची भेट घडू शकते.
मिथुन : ऑफिसच्या कर्मचाऱ्यांकडून तणावाचा सामना सहन करावा लागेल. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. आर्थिक कामात अनुकूलता प्राप्त होईल. मनोबल उत्तम राहील. कामाचा ताण कमी होईल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. काहींना गुप्तवार्ता समजतील. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी.
कर्क : ऑफिसमध्ये तुमच्या सल्ल्याची गरज भासेल. तुमच्या मवाळपणाने व्यवसायात फायदा होईल. आपले आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आईच्या बाजूने आर्थिक स्थितीत लाभ होईल. लाइफ पार्टनरसाठी भेटवस्तू घ्याल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. मानसिक चंचलता राहील. अति विचार करू नका. महत्त्वाची कामे आज टाळावीत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागेल.
सिंह : वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास दृढ होईल. कामाच्या ठिकाणीही अडचणींचा सामना करावा लागेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास दृढ होईल. मानसिक अस्वस्थता वाढेल. नकारात्मक अनुभव येतील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कामाच्या ठिकाणीही अडचणींचा सामना करावा लागेल. कामे रखडणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी. मनोबल उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. अति कामामुळे थकवा जाणवेल. बोलण्यातील माधुर्यामुळे मान मिळवाल.
कन्या : उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण आज वाढू शकतो. काहींना विविध लाभ होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. आनंदी राहणार आहात. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आज व्यावसायिक प्रतिष्ठेचा लाभ होईल. शत्रूंची संख्या वाढू शकते. आर्थिक सुयश लाभेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण करा. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च होतील.
तुळ : मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. त्यामुळे मनात आनंद होईल. व्यवसायात उत्तम स्थिती राहणार आहे. कामाचा ताण कमी होईल. कोणत्याही गोष्टी आज नुकसान होणार नाही, त्यामुळे काळजी करु नका. दैनंदिन कामे विनासायास मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होतील. योग्य शहानिशा करावी. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. आनंदाची अनुभूति घ्याल. धनलाभाचे उत्तम योग आहेत.
वृश्चिक : घरासाठी आज तुमचे पैसे खर्च होतील. रखडलेल्या व्यावसायिक योजनेला आज बळ मिळेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आर्थिक कामात सुयश लाभेल. सासरच्या लोकांकडून आज आनंद मिळेल. गुंतवणुकीतून संबंधित धावपळ करावी लागेल. नवीन सुसंधी लाभेल. कामाचा ताण कमी असणार आहे. काहींना नातेवाईक भेटतील. नवीन खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी अति घाई करू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. गुंतवणुकी संदर्भात नवीन गोष्टी जाणून घ्याल.
धनु : कुटुंबातील वाद आज पुन्हा नव्याने डोके वर काढतील. पालकांच्या सल्ल्याने वादविवाद थांबवाल. चिंता सतावेल. कसली न कसली नकारात्मकता राहील. कामाचा ताण राहील. नात्यात दूरावा येऊ शकतो. व्यवसायात गती मिळेल. मानसिक अस्वस्थतेमुळे कामात लक्ष लागणार नाही. मनोबल कायम ठेवावे. मानसिक शांतता लाभेल. कामात तुमचा उत्तम प्रभाव पडेल. सासरच्या मंडळीकडून धनलाभाचे योग आहेत.
मकर : व्यवसायाशी संबंधित काही माहिती मिळू शकते. थोडा प्रवास करावा लागू शकतो. उत्साही राहाल. उमेदीने कार्यरत राहून कामे यशस्वी कराल. मानसिक प्रसन्नता राहील. पार्टनरच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होतील. भविष्यात व्यवसाय उंचीवर नेतील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढणार आहे. प्रसन्नता राहील. धार्मिक कामाची आवड वाढेल. जोडीदाराच्या कलाने काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
कुंभ : कलेशी संबंधित असणाऱ्यांना जास्त व्यस्त राहावे लागेल. कामात थकवा जाणवेल. अचानक धनलाभ होईल. वेळ व पैसा वाया जाईल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. वाहने जपून चालवावीत. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखावे लागेल. नोकरी व्यवसायात वाद निर्माण होईल. आर्थिक कामात सावधानता हवी. जोडीदाराचे म्हणणे टाळू नका. खेळ व कलेमध्ये रमाल. अति भावुक होऊ नका. पराक्रमाला चांगला वाव आहे.
मीन : आज वडिलधाऱ्यांच्या मदतीने मालमत्ते फायदा होईल. डोळ्यांच्या समस्या उद्भवतील. सावधगिरी बाळगायला हवी. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना आर्थिक कामात सुयश लाभेल.आज उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. प्रियजनांशी सुसंवाद साधाल. आरोग्यात सुधारणा होईल. कामात अधिक स्फूर्ति येईल. मुलांसोबत दिवस खेळीमेळीत जाईल. उधारीचे व्यवहार करू नका.