मेष : तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मनात आनंद राहिल. प्रियजनांसोबत वेळ घालवाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आज तुम्हाला मुलांकडून निराशाजनक बातम्या मिळतील. विरोधकांवर मात कराल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार. आज आपणास सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक आणि दांपत्य जीवनात सौख्य लाभेल.
वृषभ : सरकारी क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर त्यातून सुटका होईल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहावे लागेल. दैनंदिन कामात अडचणी राहतील. अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागेल, त्यामुळे काळजी घ्या. मनोबल व उत्साह कमी असणार आहे. अनावश्यक खर्च होणार आहेत. आज शारीरिक, मानसिक स्वास्थ्य सांभाळून नियोजित कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण करू शकाल. आजारी व्यक्तींना आज प्रकृतीत सुधारणा जाणवेल.
मिथुन : शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन लोक भेटतील. पालकांची सेवा करण्यात वेळ घालवाल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मुलांच्या शिक्षणात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. तुमचा इतरांवर बौद्धिक प्रभाव असणार आहे. आपली कामे पूर्ण करू शकणार आहात. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नवे काम हाती घेऊ शकाल. पत्नी व संततीविषयी चिंता वाटून मनात उद्विग्नता येईल. अजीर्ण झाल्यानं प्रकृती नरम-गरम राहील.
कर्क : तुमची प्रतिष्ठा वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागेल. आजचा तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाणार आहे. अनेक बाबतीत समाधान लाभेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची आज प्रगती होईल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. चिकाटीने कार्यरत राहाल. तुमचा प्रभाव वाढेल. आज आपल्यात आनंद आणि स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल.
सिंह : मुलांच्या शिक्षणासाठी धावपळ करावी लागेल. तुम्हाला कामाचा थकवा जाणवेल. डोळ्यांची जळजळ होऊ शकते. नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. धडाडी वाढणार आहे. आज तुमच्या व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित प्रगती साध्य करू शकाल. काहींना अनपेक्षित प्रवास संभवतात. सुसंधी लाभेल. कामात यश आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्यामुळं मनात प्रसन्नता दरवळेल. भावंडांशी भावदर्शी संबंध प्रस्थापित होतील. मित्र व स्नेही यांच्यासह एखाद्या रमणीय पर्यटन स्थळी हिंडण्या-फिरण्याचा आनंद घेऊ शकाल.
कन्या : मालमत्तेशी संबंधित कोणताही कायदेशीर वाद आज जिंकाल. कुटुंबात पार्टीचे वातावरण असेल. धार्मिक कार्यक्रमावर पैसे खर्च कराल. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. आजचा तुमचा दिवस आनंदात जाणार आहे. काहींना गुप्त वार्ता समजतील. घरगुती वातावरण चांगले राहील. वाणीवर ताबा ठेवल्यानं वादविवाद होणार नाहीत. आर्थिक कामे मनासारखी पार पडतील. नकारात्मक विचारांपासून दूर राहावं लागेल. मित्रांची भेट होईल.
तुळ : व्यवसायातील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या मोठ्या व्यवहारांची समस्या दूर होईल. लांबचा प्रवास पुढे ढकलाल. मानसिक अस्वस्थता संपणार आहे. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या महत्त्वकांक्षा पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. जिद्दीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग येतील. आज आपल्या प्रत्येक कामात आत्मविश्वास असल्याचं दिसून येईल. आर्थिक योजना व्यवस्थित करू शकाल. शारीरिक, मानसिक शांतता लाभेल.
वृश्चिक : मित्रांची संख्या वाढेल. तुमचे शत्रू निर्माण होतील. तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. एखादी मानसिक चिंता राहील. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. शारीरिक समस्या येत असतील तर त्रास वाढेल. डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवासात काळजी घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी. आज बोलण्यावर ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक, मानसिक चिंता लागेल. वाहन चालवताना अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी.
धनु : उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ ठेवा, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडेल. व्यवसायात नफा होईल. मानसिक अस्वस्थता कमी होईल. विविध लाभ होतील. प्रियजन भेटणार आहेत. नवीन परिचय होतील. आज कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. मित्र-मैत्रिणींचे, सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. मित्र आणि परिवारासह पर्यटनस्थळी भटकण्याचा आनंद मिळेल.
मकर : कोणाशीही वाद घालू नका. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तुमचे पैसे खर्च होतील. कुटुंबातील सदस्य व्यस्त असतील. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. कामे मार्गी लावू शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करत असाल तर संधी मिळेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. अस्वस्थता कमी होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावं लागेल ते फायदेशीर ठरेल. व्यवसायात धन व मान-प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील.
कुंभ : प्रतिकूल बातम्या ऐकून अचानक प्रवासाला जावे लागेल. कोणाशीही वाद घालू नका. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. बुद्धीने केलेली कृती तुमचे नुकसान करु शकते. व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. चिकाटी वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रियजन भेटणार आहेत. आनंदी रहाल. आज प्रतिस्पर्ध्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्वास्थ्य राहील. आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरीत चुका होतील.
मीन : धार्मिक ठिकाणी प्रवास पैसे खर्च होतील. नातेवाईकांशी सामना करावा लागेल. विचारपूर्वक बोला, नात्यात दूरावा येईल. एखादी मनाविरुद्ध घटना संभवते. मनस्ताप संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत असाल. लग्नासाठी घाई कराल. कोणत्याही बाबतीत अतिउत्साहीपणा टाळावा. दैनंदिन कामात प्रतिकूलता जाणवेल. आज अचानक धनलाभ संभवतो. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक, मानसिक कष्टाची तयारी ठेवा. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल.