मेष : व्यवसायात तुम्हाला चढ-उतारांचा सामना करावा लागेल. व्यवसायाची गती वाढवावी लागेल. आज जिद्दीने आपण कार्यरत राहणार आहात. हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवाल. मनोबल उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल. आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला भेटाल. ज्यामुळे आनंदी असाल. आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. गुप्त शत्रूला मत्सर वाटेल. तुम्ही काही नवीन काम करू शकाल. शेतीच्या कामातून फायदा होईल.
वृषभ : राजकीय क्षेत्रातील प्रयत्नांमध्ये यश मिळेल. नवीन करारांमुळे पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. आर्थिक कामात आपल्याला सुयश लाभणार आहे. आपले आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. राजकारणी लोकांना युती फायदेशीर ठरेल. अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागेल. कौटूंबिक जीवनात आपल्याला स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होतील. रस्त्यात एखाद्या प्राण्यामुळे अपघात होऊ शकतो. वरिष्ठ नातेवाईकामुळे कुटुंबात वाद होऊ शकतो.
मिथुन : मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला असेल. आज आपला उत्साह विशेष असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. गेले दोन दिवस आपल्याला जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होईल. आज तुमच्या महत्वाच्या गोष्टी हरवू शकतात. मुलांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. आध्यात्मिक श्रद्धा जागृत होईल. सामाजिक आणि आध्यात्मिक प्रगती होईल. उद्योगधंद्यात काही अडथळे आल्यानंतर व्यवसायात यश मिळेल. कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण होतील.
कर्क : उपजीविकेच्या क्षेत्रात प्रगती होईल. आज राजकीय मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. आज आपला मनोरंजन व करमणुकीकडे कल राहणार आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही. मानसिक अस्वस्थता राहील. खर्च वाढणार आहेत. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळतील. वाहने सावकाश चालवावित. प्रवास नकोत. कोर्टाच्या कामात यश मिळेल. राजकारणातील भामट्यांपासून सावध राहा. अन्यथा तुमची प्रतिष्ठा जाऊ शकते.
सिंह : नोकरीत पदोन्नती मिळवण्यासाठी बोलण्यात मृदुपणा आणावा लागेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आज तुमची वैचारिकता बदलणार आहे. काहींना आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मुलांच्या लग्नाचे प्रस्ताव येतील. शारीरिक समस्यांनी त्रस्त असाल. आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. व्यवसायात तुम्हाला मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. राजकारणात महत्त्वाचे पद मिळू शकते. नवीन व्यवसाय सुरू करणे टाळा.
कन्या : तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. ज्यामुळे भविष्याबद्दल तुमची चिंता कमी होईल. तुम्ही आज विशेष जिद्दीने कार्यरत रहाणार आहात. आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखावे लागेल अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. सर्वत्र तुमचा प्रभाव वाढेल. रोजगाराचा शोध पूर्ण होणार नाही. नोकरीत वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. जमिनीशी संबंधित वाद न्यायालयात पोहोचू शकतात.
तुळ : आज तुमची पैशांच्या बाबतीत समस्या संपतील. मनोबल वाढेल. गेले दोन दिवस झालेला मनस्ताप आज कमी होणार आहे. कामाचा व्याप वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाल. हातात पुरेसा पैसा असल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. नोकरीत अधीनस्थांशी वाद होण्याची शक्यता आहे. रागावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राजकारणातील विरोधक त्यांच्याच कारस्थानात अडकू शकतात.
वृश्चिक : नोकरीच्या ठिकाणी कामात वाढ होऊ शकते. कठोर परिश्रम केल्याने सर्व कामे पूर्ण होतील. भावा-बहिणांना लग्नाचे प्रस्ताव येतील. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. काहींना आज विनाकारण एखादी चिंता लागून राहील. मनोबल व आत्मविश्वास कमी असल्याने आज आपले कोणत्याच कामामध्ये लक्ष लागणारनाही. रखडलेली कामे आज पूर्ण करावी लागील. प्रवास आज नकोत. काही अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावर देऊ नका.
धनु : सरकारी लोक जवळकीचा फायदा घेतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनातील मतभेद कमी होणार आहेत. आज विरोधक तुमच्या कामाची स्तुती करतील. प्रवास सुखकर होतील. कामाचा ताण वाढेल. नोकरीत पदोन्नतीसह लाभदायक पद मिळेल. राजकारणात वर्चस्व प्रस्थापित होईल. नोकरी मिळण्यातील अडथळे दूर होतील.
मकर : उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात प्रयत्नांना यश मिळेल. व्यावसायिक लोक आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करतील. आज आपली मानसिकता काही प्रमाणात नकारात्मक असणार आहे. महत्त्वाची कामे करण्याचे आज शक्यतो टाळावे. मनोबल कमी राहील. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत आज यश मिळेल. प्रवास करताना काळजी घ्यावी. आज कोणताही अतिउत्साहीपणा नको. राजकारणात प्रतिष्ठा वाढेल. प्रवासात अनोळखी व्यक्तीकडून कोणतेही खाणे-पिणे घेऊ नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.
कुंभ : तुम्हाला खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावे लागेल. संयम आणि शाहणपणा दाखवला नाही तर मतभेद वाढतील. प्रियजनांच्या सहवासात आजचा दिवस उत्तम जाणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस विशेष अनुकूल असणार आहे. मनोबल उत्तम राहील. वासनेच्या ठिकाणी विश्रांती आणि निद्रा अधिक इष्ट आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करताना जोखीम पत्करणे फायदेशीर ठरेल.
मीन : मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात. नात्यात दुरावा येऊ शकतो. वैवाहिक जीवनात आलेले अडथळे दूर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज आपण आशावादीपणे कार्यरत रहाणार आहात. आपल्याला प्रवसाकरिता अनुकूलता लाभणार आहे. आजचा दिवस कामाच्या बाबतीत काळजी वाढेल. मनोबल उत्तम असणार आहे. सार्वजनिक कामात मानसन्मान लाभेल. वडिलोपार्जित संपत्ती मिळविण्यातील अडथळा वरिष्ठ नातेवाईकाच्या मध्यस्थीने दूर होईल. व्यावसायिक योजना गुप्तपणे पार पाडा.