मेष : आरोग्याबाबत निष्काळजी पणा दाखवू नका. तुमच्यावर नकारात्मक परिणाम होईल. आपले मनोबल आज कमी असणार आहे. एखाद्या बाबतीत आज आपली चिडचिड होणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. कामांमध्ये लक्ष लागणार नाही. व्यवसायात काही नवीन बदल होतील. ज्याचा तुम्ही फायदा घ्याल. काहींना नैराश्य जाणवणार आहे. प्रवास नकोत.
वृषभ : मन शांत ठेवून काम करावे लागेल. कोणतेही काम पूर्ण करण्याआधी नीट लक्ष द्या. आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज आपल्याला आपल्या प्रियजनांच्या गाठीभेटी घेता येणार आहेत. आज तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. मानसिकता उत्तम असणार आहे.
मिथुन : तुमचे मन प्रसन्न राहिल. तुम्ही पैसे नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवाल,भविष्यात पुरेपूर फायदा घ्याल. आपले मनोबल आज उत्तम असणार आहे. तुमच्या मतांचा व विचारांचा आज प्रभाव असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुम्ही आपले प्रभुत्व सिद्ध करू शकणार आहात. आज तुम्हाला व्यवसायात मेहनत केल्यावर फायदा मिळेल. प्रवासासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे.
कर्क: सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांची संख्या वाढल्याने भविष्यात फायदा होईल. आज आपला उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आपले आरोग्य उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. आज तुमच्या भौतिक सुखांमध्ये वाढ होईल. काहींना नवी दिशा सापडेल.
सिंह : तुमचा जुना मित्र भेटेल. कार्यक्षमतेने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतील. मानसिक स्वस्थता लाभणार नाही. आज तुमचे मन नाराज असणार आहे. दैनंदिन कामे रखडणार आहेत. आज तुम्हाला काही मौल्यवान वस्तू मिळतील. ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आज आपण शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. प्रतिकुलता जाणवेल.
कन्या : नोकरदार लोक त्यांच्या आवडीचे काम करतील. ज्यामुळे आनंद मिळेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आज तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कामे यशस्वी होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. अनेकांना आज तुम्ही मदतीचा हात द्याल.
तुळ : आरोग्याच्या समस्या उद्भवतील. कुटुंबाकडून माहिती मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल व त्यामुळे आज आपली चिडचिड होणार आहे. दैनंदिन कामात अडचणी व विलंब अनुभवणार आहात. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीकोनातून नरम असेल. आज काहींचे मन आध्यात्मिक गोष्टीत रमणार आहे.
वृश्चिक : कुटुंबासोबत वेळ घालवाल. पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी ही वेळ योग्य नाही. पैसे अडकू शकतात. आज आपल्याला विविध लाभ होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. तुमच्यामध्ये वैचारिक परिवर्तन होणार आहे. प्रवासातून आनंद मिळणार आहे. आज कुटुंबाला दिलेले वचन पूर्ण कराल. ज्यामुळे आनंदी असाल. प्रियजनांबरोबर आजचा दिवस आपण आनंदात व्यतीत करू शकणार आहात.
धनुः उधार दिलेले पैसे आज परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. भावाशी तुमच्या वाद होईल. आज तुम्ही आनंदी व आशावादी राहणार आहात. कामे यशस्वी झाल्याने तुमचे मन उत्साही राहील. आज सार्वजनिक कार्यात तुम्ही अग्रेसर राहणार आहात. आज तुम्हाला व्यवसायात एकापाठोपाठ फायदे होतील. काहींना मान-सन्मान लाभणार आहे.
मकर : घरामध्ये काही समस्या सुरु असतील तर त्या संपतील. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने गोष्टी सोडवाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आज व्यवसायात तुमच्या प्रयत्नांना फळ मिळेल. आज तुमचे मनोबल व तुमचा उत्साह दोन्ही विशेष असणार आहे. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे.
कुंभ : आज तुम्हाला तुमच्या एखाद्या वरिष्ठाच्या मदतीने नोकरीत बढती मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आर्थिक कामे मार्गी लागल्याने आज तुमचे मन आनंदी राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांकरिता वेळ देणार आहात. आजचा दिवस तुमच्या भविष्यासाठी नवीन योजना आणेल असे गणेश सांगतात. आज काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.
मीन : कोणाच्याही प्रभावाखाली निर्णय घेऊ नका. भविष्यात मोठ्या संकटात सापडाल. आज तुम्ही आनंदी राहणार आहात. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुमचे मन थोडे उदास राहिल. तुमचा इतरांवर आज प्रभाव असणार आहे. आरोग्य उत्तम राहील.