मेष : कार्यक्षेत्रात अनेक संधी येतील, मर्यादेत काम करावे लागेल. कुटुंबात काही सदस्यांची उणिव भासेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही विशेष उत्साहाने कार्यरत राहणार आहात. आज तुमच्या अनियंत्रित कृतीमुळे आजूबाजूचे वातावरण बिघडेल. मानसिक ताकद वाढेल.
वृषभ : दिवसाच्या सुरुवातीला थोडी भीती राहिल. नकारात्मक विचार मनात येतील. कामात व्यस्त असल्यामुळे प्रवास घडेल. मनोबल कमी असल्याने दैनंदिन कामात काही अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आज परिस्थिती गोंधळाची निर्माण होईल. आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. प्रवास टाळावेत. खर्च वाढतील.
मिथुन : व्यावहारिकतेकडे अधिक लक्ष द्या. तुमचा नफा कुणीही हिसकावून घेणार नाही याकडे लक्ष द्या. खर्च वाढेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज तुम्ही काम सोडून इतरांना सल्ला द्याल. प्रवास सुखकर होणार आहेत. दैनंदिन कामे यशस्वीपणे पार पाडणार आहात.
कर्क : काही विपरित परिस्थितीचा सामना करावा लागेल. नातेवाईकांचे ऐकावे लागेल. आर्थिक समस्या कमी होतील. मनोबल कमी असणार आहे. प्रवास टाळावेत. वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. तुमच्यावर कोणतातरी मानसिक ताण राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहिल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अनावश्यक खर्च वाढतील.
सिंह : तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याने उत्साही असाल. कामासाठी कमी वेळ द्याल. सामाजिक कार्यात सहभागी व्हावे लागेल. संततीसौख्य लाभेल. मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकणार आहात. काहींना विविध लाभ होतील. मनोबल उत्तम राहील. अचानक काम खोळंबल्याने अडचणींचा सामना करावा लागेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.
कन्या : व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. जास्त खर्चामुळे काही महत्त्वाचे काम रद्द करावे लागेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. अधिक सकारात्मकपणे व अधिक आशावादीपणे तुम्ही कार्यरत राहणार आहात. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यामुळे मानसिक शांतता राहिल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल. मान-सन्मान लाभेल.
तुळ : कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन फायदेशीर करार होतील. अचानक कुठूनतरी पैसे मिळतील. आजचा दिवस भाग्याचा असेल. जिद्दीने कार्यरत राहाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. आरोग्य उत्तम राहील. भविष्यातील खर्च लक्षात घेऊन नफा मिळविण्याची मानसिकता राहिल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. आनंदी व उत्साही राहाल. तुमच्यामध्ये असणारी उमेद वाढणार आहे.
वृश्चिक : नोकरी आणि व्यवसायाची स्थिती सामान्य राहिल. खर्चाच्या वाढीमुळे थोडी चिंता असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मानसिक बळ लाभेल. आज तुम्हाला कोणतेही काम लवकर करता येणार नाही. तुम्ही कामात अधिक व्यस्त असाल. प्रियजनांच्या सहवासात आनंदी दिवस जाईल. आर्थिक लाभ होतील.
धनु : दिवसाच्या सुरुवातीपासून घरगुती वातावरण सुधारण्याचा प्रयत्न कराल. तुमचे वागणे उद्धट राहिल. तुम्हाला बाहेरुन सहानभूती दाखवावी लागेल. आज तुमची नियोजित कामे वेळेवर पार पडल्याने तुमचा उत्साह वाढेल. आनंदी राहाल. तुमच्यात मत्सराची भावना राहिल. घरातील शांततापूर्ण वातावरण भंग होण्याची शक्यता आहे. प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल आहे. समाधानी राहाल.
मकर : वाद होण्याची शक्यता तुम्हाला अस्वस्थ करेल. कामाच्या व्यवसायातून नफा मिळू शकतो. मानसिक उद्विग्नता राहील. प्रवास टाळावेत. वादविवादात सहभाग टाळावा. मनोबल कमी राहील. काहींना नैराश्य जाणवेल. आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. काही परिस्थितीमुळे राग येईल. मनोबल कमी असणार आहे. आज शक्यतो महत्त्वाच्या कामांचे नियोजन नको.
कुंभ : बाहेर पडण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्याल. कामाच्या व्यवसायातून फायदा होईल. दुपारनंतर तुमचा आळस वाढेल. दैनंदिन कामे होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी सुसंवाद साधणार आहात. घरातील कामे वेळेवर पूर्ण करा, अन्यथा मतभेद होतील. व्यापारीवर्गामुळे प्रगती होईल. प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. आनंदी व आशावादी राहणार आहात. आर्थिक लाभ होतील.
मीन : दिवसाच्या सुरुवातीला मन प्रसन्न राहिल. घरामध्ये काही विशेष कामाबद्दल अडचणी येतील. व्यवसाय कार्यक्षेत्रात समाधानकारक असाल. मनोबल वाढणार आहे. काहींना आज अचानक धनलाभ होणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदासाठी तुम्हाला तडजोड करावी लागेल. तुमच्या निर्णायक वृत्तीमुळे आज तुमची वाहवा होईल. आनंदी राहणार आहात.