मेष : तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही निराशाजनक बातम्या ऐकू येतील. कौटुंबिक सदस्यांबरोबर सुसंवाद साधाल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आज संध्याकाळी तुमचे काही काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम आणि व्यवहार करावे लागतील.
वृषभ : राजकीय क्षेत्रात यश मिळेल. मानसिक शांती मिळेल. मित्रांची संख्या वाढेल. आज सर्वत्र तुमचा विशेष प्रभाव असणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. नवीन करार मिळाल्याने तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला काही त्रासाला सामोरे जावे लागेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन आणि स्थिर विचारांमुळं सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल.
मिथुन : प्रवास करताना सावधगिरी बाळगा. मौल्यवान वस्तू चोरीला जावू शकता. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. मानसिक अस्वस्थता असल्याने कामात लक्ष लागणार नाही. आज तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात काही प्रवास करावा लागू शकतो. प्रवासात काळजी घ्यावी. मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळं वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. एखादा अपघात संभवतो.
कर्क : तुम्ही व्यवसायात नवीन गोष्टींचा वापर कराल. भविष्यात तुम्हाला यश मिळेल. उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. जुन्या आठवणींना उजाळा देणार आहात. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. आज तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला असेल. नवीन परिचय होतील. काहींना अनपेक्षितपणे धनलाभ होणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी, व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील.
सिंह : आज व्यवसायात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होऊ शकतात. भावाच्या सल्ल्याने काही गोष्टी ठिक होतील. सार्वजनिक क्षेत्रात उत्साहाने सहभागी होणार आहात. आरोग्य उत्तम राहील. कोणताही व्यावसायिक सौदा बराच काळ अडकला असेल तर तो शेवटचा असेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. नोकरी-व्यापार, व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावीत होतील. वडिलांकडून काही फायदा होऊ शकतो.
कन्या : तुमचा पैसा चांगल्या कामात खर्च होईल. तुमची कीर्ती वाढेल. नोकरीच्या क्षेत्रात यश मिळेल. दुपारनंतर कायदेशीर वाद किंवा खटला जिंकण्याची दाट शक्यता आहे. कामाचा उरक राहील. जिद्दीने कार्यरत राहाल. तुमचा उत्साह विशेष असणार आहे. आज मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम राहील. आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्या नातेवाईकां कडून आनंददायी बातमी समजल्यानं आपण आनंदित व्हाल.
तुळ : कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये आनंद वाढेल. तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ राहिल. महत्त्वाची कामे आज नकोत. काहींना भावनिक दडपण राहील. आज तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंददायी असेल. आरोग्य जपावे. कामाचा ताण राहील. काहींना नैराश्य जाणवणार आहे. आपलं वक्तव्य आणि वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक : आज तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला आज व्यवसायात अधिक लक्ष द्यावे लागेल अन्यथा नुकसान होईल. दैनंदिन जीवनात काहींना उत्साह जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सावधगिरीचा असेल. वैवाहिक जीवनातील सुसंवाद आनंददायी असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. उत्तम भोजन आणि नवीन आभूषणे मिळाल्यानं आपण खूप आनंदित व्हाल. व्यापार-भागीदारीत फायदा होईल.
धनु : तुम्हाला सावध राहाण्याची गरज आहे. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. आज तुमचे विरोधक तुमची स्तुती करताना दिसतील. मानसिक स्वास्थ्य कमी असल्याने कामात लक्ष लागणार नाही. सासरच्या लोकांकडून पुरेशी रक्कम मिळेल. विनाकारण खर्च होणार आहेत. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी आणि शत्रूवर विजय मिळवाल. कार्यालयात सहकारी व हाताखालच्या व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
मकर : उदरनिर्वाहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज उत्कृष्ट संधी मिळेल. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. संतती सौख्य लाभणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. द्विधा मनःस्थितीमुळं निर्णय घेण्यात अडचणी येतील.
कुंभ : व्यवसायाला नवीन उंचीवर नेण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात पार्टनरशीपमध्ये काम केल्यास चांगले यश मिळेल. मानसिक स्वास्थ्य असल्याने विशेष उत्साही राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. मित्राच्या सल्ल्याने आज व्यवसायात भरभराटी होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा लाभेल. अती भावनाशीलतेमुळं मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. घर, संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत.
मीन : जोडीदाराच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. धार्मिक स्थळांवर पैसे खर्च कराल. सावधगिरी बाळगायला हवी. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज तुम्हाला मुलांच्या परीक्षेशी संबंधित मोठा निर्णय घ्यावा लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कामे यशस्वी होईपर्यंत चिकाटीने कार्यरत राहाल. आपली सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार आणि खंबीर मन यामुळं कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. मित्रांसह प्रवास होऊ शकेल. भावंडांशी जवळीक वाढेल.