मेष : नोकरी व्यवसायातून पैसे मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाही. नातेवाइकांचे सौख्य लाभणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. आज तुमच्या अहंकारामुळे सगळं गमवाल त्यामुळे तुमचा अपमान होऊ शकतो. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. भाग्यकारक घटना घडेल. बरेच दिवसांपासून राहिलेले काम पूर्ण होईल. दिवस सत्कारणी लावल्याचा आनंद मिळेल.
वृषभ : आज काम अनिच्छेने करावे लागेल. आरोग्याच्या किरकोळ समस्या निर्माण होतील. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मनोरंजनाच्या संधी सोडणार नाही. कुटुंबात मतभेद होकील. कार्यक्षेत्रात जुन्या गोष्टींमुळे मनात भीती राहिल. दुपारनंतर काहींना अनपेक्षित प्रवास संभवतो. कामाचा ताण राहणार आहे. स्वास्थ्य लाभेल. आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल. प्रशंसेस पात्र व्हाल. मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दीर होतील.
मिथुन : सामाजिक क्षेत्रातील वाद मिटवण्यासाठी तुमचे सहकार्य घेतले जाईल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ संभवतो. चिकाटी वाढणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. कामाच्या ठिकाणी अनुभवाच्या मदतीने संधी निर्माण कराल. अतिआत्मविश्वासाची भावना काम बिघडवेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल. कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील.
कर्क : कुटुंबातील सदस्य तुमच्या कामामुळे असमाधानी असतील. काही कारणामुळे मन विचलित होईल. दुपारनंतर तुमचे मनोबल वाढणार आहे. दिवसाची सुरुवात जरी अडचणीची झाली तरी दुपारनंतर अडचणी कमी होणार आहेत. आज तुम्हाला विनाकारण कलह आणि त्रासाला सामोरे जावे लागेल. आरोग्य उत्तम राहील. कामाचा ताण राहील. आपल्या कालगुणांना वाव मिळेल. व्यवसायात जपून निर्णय घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल.
सिंह : भावंडांच्या वागणुकीमुळे तुम्ही चिंतेत पडाल. आज कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. महत्त्वाची आर्थिक कामे आज नकोत. प्रवासात अडचणी संभवतात. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. सुख-सुविधांमध्ये घट होईल. तुमची एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. मनोबल कमी राहील. सामाजिक कामासाठी वेळ द्याल. जोखीम पत्करून काम कराल. स्थावर खरेदी-विक्रीचे व्यवहार पुढे सरकतील.
कन्या : पैशांची आवक होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. आर्थिक लाभ होतील. जोडीदारावर अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. दुपारनंतर काहींना आर्थिक लाभ होतील. अनपेक्षित गाठीभेटी पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल. आज तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल मत्सराची भावना निर्माण होईल. चिकाटी वाढणार आहे. बौद्धिक क्षेत्रात सुयश लाभेल. प्रवास होतील. समोरच्या व्यक्तीची समजूत काढावी लागेल. दैनंदिन कामात बदल करून पाहावं. व्यापारी वर्ग खुश राहील.
तुळ : बोलताना मोठ्यांचा आदर करा. तुमच्या इच्छेचे पालन करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न कराल. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल वाढेल. व्यवसायात अनुकूल बदल करू शकाल. नोकरीत प्रगती होईल. आज तुमच्या स्वभावात आणि वागणुकीत बराच फरक जाणवेल. हितशत्रुवर मात कराल. चिकाटीने कार्यरत राहाल. आर्थिक व्यवहारात संभ्रम टाळावा. अपुर्या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका. बोलण्याची घाई करू नका.
वृश्चिक : कोणत्याही कामात स्वत:वर जबरदस्ती करु नका. अपशयामुळे चुकीच्या गोष्टी कराल. कोर्टाच्या गोष्टी अडकाल. दिवसाची सुरुवात कंटाळवाणी असली तरी दुपारनंतर तुमचा उत्साह उत्तम राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगले फल देईल. रखडलेली व दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कामे यशस्वी होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य जपावे. विचारांना योग्य दिशा द्यावी. प्रिय व्यक्तिला दुखवू नका. मित्राची योग्य साथ मिळेल.
धनु : बाहेरील लोकांशी कमी संपर्क ठेवा. तुमची बदनामी होऊ शकते. काही गोष्टीवरुन वाद होऊ शकतो. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. मनोबल कमी असणार आहे. कामाचा ताण राहील. आज आपल्या सामाजिक वर्तनावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपारनंतर एखादी मनस्तापदायक घटना संभवते. आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. दिवसाचा बराच काळ कामात गुंतून राहाल. भावंडांशी नाते दृढ होईल.
मकर : कौटुंबिक सदस्यांशी भांडण होण्याची भीती असेल. घरातील व्यक्तीशी मालमत्ता किंवा व्यवसायाबाबत वाद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतरचा दिवस तुम्हाला अनुकूल जाणार आहे. हितशत्रूवर मात करणार आहात. चिकाटीने कार्यरत राहावे लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अनेक गुंतागुंतीचा असेल. प्रवासाचे योग येणार आहेत. दैनंदिन कामे यशस्वी होतील. बरेच दिवस राहून गेलेले काम पूर्ण होईल. मित्रांशी वाद संपुष्टात येतील. मानसिक शांतता लाभेल.
कुंभ : जीवनातील व्यस्ततेमुळे आपल्याला यासाठी योग्य वेळ मिळत नाही. काम आणि व्यवसायात देखील चांगले काम कराल. दुपारनंतरचा दिवस प्रतिकूल आहे. अनावश्यक कामे करावी लागतील. तुमचा वेळ व पैसा खर्च होणार आहे. आज मन धार्मिक कार्याने भरलेले राहिल. मानसिक अस्वस्थता राहील. प्रकृती जपावी. प्रवास नकोत. करमणुकीत बराच काळ घालवाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपली प्रतिमा जपावी.
मीन : सर्दी-खोकल्याच्या तक्रारी सुरु राहातील. काम करण्याचा उत्साह कमी राहिल. तब्येतीमुळे आळसपणा वाढेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णयावर दुपारनंतर विचार कराल. आज तुम्ही आजाराने त्रस्त असाल. डोकेदुखीमुळे जडपणा जाणवेल. काहींना दुपारनंतर आर्थिक लाभ संभवतो. खर्च कमी होतील. घराची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ संभवतो. रागावर ताबा ठेवावा. ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद लाभेल.