मेष : तुम्हाला ऑफिसमधील काम काळजीपूर्वक करावे लागणार आहे. शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. उत्साह व उमेद वाढेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे व गुंतवणुकीची कामे दुपारपूर्वी करावीत. आज तुम्ही काही खास कार्यक्रमासाठी वेळ घालवाल. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे. घरातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ : कुटुंबातील वातावरण शांत असेल. व्यावसायिकांना आज वेळेचा सदुपयोग करुन ज्ञान मिळवावे लागेल. दुपारपूर्वी प्रवासाचे योग येतील. कामाचा ताण कमी राहील. दुपारनंतर मानसिक सौख्य लाभेल. आनंदी व आशावादी राहाल.आज मुलांची प्रगती पाहून मन प्रसन्न राहिल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. व्यावसायिक ठिकाणी काही लक्षात ठेवण्याजोगे अनुभव येतील. ग्रहांचा चांगला पाठिंबा मिळेल.
मिथुन : जोडीदाराला बाहेर कुठेतरी घेऊन जाल. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कराल. आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे, महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना प्रवास संभवतो. आर्थिक स्थिती मध्यम असेल. दिवसभरात नफा मिळण्याची शक्यता आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. मित्रांचा विचित्र अनुभव येऊ शकतो. कौटुंबिक चर्चेत आक्रमक होऊ नका.
कर्क : नातेवाईकांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या प्रगतीतून चांगली आर्थिक लाभ मिळू शकता. महत्त्वाची कामे होतील. आर्थिक व्यवहार दुपारनंतर करावेत. आनंदी वार्ता मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज कायदेशीर बाबींमध्ये यशाची प्रतीक्षा करावी लागेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आनंदी राहणार आहात. भागीदारीचा निर्णय विचारपूर्वक करा. अंगीभूत कलागुणांना वाव मिळेल.
सिंह : कौटुंबिक वातावरण गोंधळाचे असू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये मत नसल्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कामाचा ताण असणार आहे. दिवसाची सुरुवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. आजचा दिवस तुमच्या अनुभवातून समस्या संपवण्याचा असेल. उत्साह व उमेद वाढेल. जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या : नोकरी करत असाल तर त्यात सुरु ठेवा. परेक्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अडचणींचा असेल. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवणार आहे. प्रवास आज नकोत. नोकरीतील बदलासाठी आजचा दिवस चांगला नसेल. दुपारनंतर काहींना एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. घरात आनंदी वातावरण राहील. व्यवसाय पुन्हा मूळ पदावर येईल.
तुळ : नातेवाईकांशी भेट झाल्याने मन प्रसन्न राहिल. मित्राच्या मदतीने बिघडलेले काम नीट कराल. मानसिक ताकद उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. आनंदी व आशावादी राहाल. प्रवास सुखकर होतील. आज राजकारणातील लोकांना फायदा होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद पाठीशी ठेवा. कामात असताना इतरत्र लक्ष देऊ नका.
वृश्चिक : आईच्या तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक कारणांमुळे कौटुंबिक गरजा अपूर्ण राहातील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. दुपारनंतर विशेष उत्साही राहाल. सार्वजनिक क्षेत्रात मान-सन्मानाचे योग येणार आहेत. कामकाजात सुधारणा करण्यात हारभार लागेल. तज्ज्ञांचा सल्ला उपयुक्त ठरेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. लहान प्रवास घडेल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
धनु : वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सासरच्या लोकांसोबत नात्यात कटुता येईल. जोडीदार तुमच्यासोबत कायम राहिल. दुपारनंतर तुमची मानसिकता सुधारेल. दुपारनंतर काहींना उत्साही वाटेल. कामाचा ताण मात्र असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. आज अचानक धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. जोडीदाराशी सुसंवाद घडेल. कौटुंबिक गैरसमज टाळा. शिक्षण, स्पर्धेत यश मिळेल.
मकर : मानसिक शांती आज मिळेल. कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे आज मिळतील. हितशत्रूवर मात करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत. व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. व्यावसायिक संधी लक्षात घ्याव्यात. व्यायामाचा आळस करू नका. जोडीदार तुमच्यावर खुश असेल.
कुंभ : इच्छुकांचे लग्न आज जमेल. व्यापाऱ्यांसाठी लाभाची स्थिती सामान्य राहिल. दुपारनंतर तुमची दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत. मनोधैर्य कमी राहील. खर्च वाढतील. उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांची आर्थिक समस्या आज संपतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. चांगले मनोरंजन घडेल. कोर्टाची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाबतीतील प्रयत्न यश देतील.
मीन : सामाजिक क्षेत्रात तुम्हाला सन्मान मिळेल. तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. घरात शुभ कार्य घडतील. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासात काळजी घ्यावी. आरोग्य जपावे. वाहने सावकाश व लक्षपूर्वक चालवावीत. कामाच्या ठिकाणी उत्साहाने निर्णय घेऊ नका. नुकसान होऊ शकते. मनोबल कमी राहील. कामातील उत्साह व धडाडी वाढेल. जुने मित्र भेटतील. वाहन चालवताना काळजी घ्या. बोलण्यात सौम्यता बाळगा.