मेष राशी :-
दानधर्म करा. देवीची पूजा करा. दिवस चांगला जाईल. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. यश डोक्यात जाणार नाही याची काळजी घ्या. वास्तवाचे भान राखून हुशारीने वागाल बोलाल तर फायदा होईल. शुभ रंग – किरमिजी.
वृषभ राशी :-
अडचणीत सापडलेल्यांना मदत करा. अन्न दान करा. देवी तुमचं भलं करेल. प्रगती होईल. महत्त्वाची कामं आणि अडलेली कामं झाल्याने आनंदी व्हाल. प्रतिष्ठा वाढेल. शुभ रंग – निळा.
मिथुन राशी :-
परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे हिताचे. सत्कार्याचे लाभ मिळतील तर दुष्कर्माचे परिणाम भोगावे लागतील हे लक्षात ठेवा. हुशारीने वागाल तर वेळ निभावून न्याल. रंग शुभ – मोरपिशी.
कर्क राशी :-
ओळखीतल्यांसाठी वेळ काढा. त्यांच्या मनाचा विचार करा. जवळच्यांची साथ असेल तर तरुन जाल. दिवस बरा जाईल. जोडीदाराला वेळ द्या. शुभ रंग – आकाशी.
सिंह राशी :-
सावध व्हा. हुशारीने वागा. शत्रूवर हुशारीने मात करू शकाल. विरोधकांच्या हालचालींचा अंदाज आला तर प्रगतीमधील अडथळा दूर करणे सोपे होते हे लक्षात ठेवा. शुभ रंग – नारिंगी.
कन्या राशी :-
प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा. जिद्दीने काम केले तर प्रगती अटळ आहे. नियोजन करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. चुका टाळाल तर फायदा होईल. शुभ रंग – पोपटी.
तूळ राशी :-
परिस्थितीशी सहजतेने जुळवून घ्याल आणि हुशारीने वागाल. इतरांवर प्रभाव टाकाल. कौतुक होईल. प्रगती होईल. शुभ रंग – पांढरा.
वृश्चिक राशी :-
व्यवहार मुत्सदीपणे हाताळाल. प्रत्येक स्थितीतून मार्ग काढाल. हुशारीने वागाल. इतरांवर प्रभाव टाकाल. प्रतिष्ठा वाढेल. शुभ रंग – गुलाबी.
धनु राशी :-
कौशल्याचा सुरेख वापर कराल. इतरांवर प्रभाव पाडू शकाल. प्रगती कराल. दिवस मजेत जाईल. दानधर्म करा. गोड बोलाल तर लाभ होईल. शुभ रंग – पिवळा.
मकर राशी :-
निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि विचारपूर्वक घेणे हिताचे. शब्द जपून वापरणे आणि संयमाने वागणे लाभाचे. दिवस चांगला आहे. हुशारीने प्रगती करण्याची संधी आहे. शुभ रंग – जांभळा.
कुंभ राशी :-
वाद टाळणे, समोरच्याची बाजू समजून घेणे हिताचे. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. निराशेने खचून जाऊ नका. शुभ रंग – तपकिरी.
मीन राशी :-
वैचारिक गोंधळ टाळा. वास्तवाचे भान राखाल तर लाभ होईल. आत्मनिर्भर होणे हिताचे. स्वतःची कौशल्ये प्रगतीची संधी मिळवून देतील. शुभ रंग – सोनेरी.