मेष
नवीन कामांना सुरुवात करण्यास आजचा दिवस उत्तम आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. शत्रूंवर विजय मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृषभ
राजयोगाचा प्रभाव लाभेल. महत्त्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल. आर्थिक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन
व्यवसायात किंवा नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन योजना तयार कराव्यात. आरोग्याकडे लक्ष द्यावे.
कर्क
मान-सन्मानात वाढ होईल. कुटुंब व समाजात प्रतिष्ठा मिळेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
सिंह
महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होतील. व्यापारात किंवा शेअर व्यवहारात लाभ होईल. मित्रांचा सहवास लाभेल. कामात समाधान मिळेल.
कन्या
मालमत्तेच्या व्यवहारातून फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नवीन योजना यश देणाऱ्या ठरतील.
तूळ
नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीस अनुकूल दिवस. आरोग्य चांगले राहील.
वृश्चिक
विवाहप्रस्ताव किंवा शुभ बातमी मिळेल. नातेसंबंधात गोडवा येईल. व्यवसायातील अडथळे दूर होतील.
धनु
महत्त्वाच्या आर्थिक गोष्टींकडे लक्ष द्या. कुटुंबात चर्चा आवश्यक आहे. वाहन खरेदीचा योग आहे.
मकर
आरोग्याची काळजी घ्या. व्यायाम आणि आहार नियंत्रित ठेवा. कामातील अडथळे दूर होतील. घरात सुखद वातावरण राहील.
कुंभ
कुटुंबात आनंददायक घटना घडतील. नवे संबंध निर्माण होतील. प्रवासाचा योग आहे. मानसिक समाधान मिळेल.
मीन
नवीन नात्यांची सुरुवात होण्याची शक्यता आहे. शुभकार्याच्या योजना आखाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.