जळगांव(प्रतिनिधी) : जळगांव शहरामधील गरजू महिलांना आर्थिक संपन्नता यावी व घरी राहून करता येईल असे कपडे ईस्त्री चे प्रशिक्षण मराठी प्रतिष्ठान च्या माध्यमातून विनामूल्य देण्यात येणार आहे.
तसेच गॅस ईस्त्री-गॅस सिलेंडर-कपडे ईस्त्री करीता लागणारे लाकडी टेबल या वस्तू घेण्याकरिता पन्नास हजार रुपयांचे कर्ज बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गॅस ईस्त्री,गॅस हंडी, ईस्त्री टेबल खरेदी केले जाणार आहे.
पॅन्ट,शर्ट,साडी,यांची दर्जेदार ईस्त्री कशी करावी,कॉटन कपड्याची ईस्त्री करताना कोणती युक्ती वापरावी,सिंथेटिक कपडे ईस्त्री करताना कोणती काळजी घ्यावी,दर्जेदार व कडक ईस्त्री कशी करावी असे प्रशिक्षणा चे स्वरूप असेल.
घराबाहेर न जाता घरी करता येईल असा कपडे ईस्त्री करण्याचा व्यवसाय महिलांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देईल.
बचत गटाच्या महिला,बेरोजगार महिला,शहराच्या दूरवर असलेल्या कॉलनी मधील महिला यांना प्राधान्य असेल.
सुरवातीला पन्नास महिलांना प्रशिक्षण दिले जाईल.
विनामूल्य प्रशिक्षणा करीता नाव नोंदणी जमील देशपांडे, गणपती नगर, विजय कुमार रामदास, नवी पेठ जळगांव येथे आधार कार्ड व पॅन कार्ड झेरॉक्स सह संपर्क साधावा.