वरणगाव (प्रतिनिधी) प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव येथील वासुदेव नेत्रालयाचे नेत्र तज्ञ डॉ.सौ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील हे दर निवडणुकी प्रमाणे यावेळी देखील मतदार जनजागृती अभियान रावबणार आहेत.
मतदान जनजागृती व्हावी सोबतच मतदानाचा टक्का वाढवा म्हणून वरणगाव येथील वासुदेव नेत्रालय दि.१ ते ३० नोव्हेंबर नेत्र तपासणी शिबीर राबवणार आहे.या कालावधीत नेत्रतपासणी फी फक्त रु..१००/- राहणार आहे. या लोकशाही उत्सवासाठी आपला देखील हातभार लागावा म्हणून वासुदेव नेत्रालय २०१४ मध्ये सुरु झाल्यापासून प्रत्येक लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत आदी विविध निवडणुकांमध्ये मतदान जनजागृती उपक्रम राबवत असून आपले सामाजिक भान जोपासत आहे.
वासुदेव नेत्रालायाच्या मतदार जनजागृती अभियानाची दखल घेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून वासुदेव नेत्रालयाला विशेष गौरवपत्र प्राप्त झाले होते.तसेच अलीकडेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग,मुंबई चे सहायक आयुक्त डॉ.जगदीश मोरे यांनी देखील उपक्रमाची दखल घेत उल्लेखनीय कार्य असे गौरव पत्र पाठवले आहे.
सशक्त लोकशाहीसाठी मतदान आवश्यक : डॉ.नितु पाटील !
प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे लोकशाही बळकट करणे होय.मतदान हा लोकशाहीचा सर्वोत्तम उत्सव आहे.तेव्ह्या प्रत्येक नागरिकाने मतदान करण्यासाठी प्रेरित व्हावे यासाठी दि. १ ते ३० नोव्हेंबर या काळात नेत्र तपासणी शुल्कात सूट मिळणार आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी.