मुंबई (वृत्तसंस्था) मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहाबघ माझी आठवण येते का? याप्रमाणे आता आम्हा तिन्ही पक्षांना दररोज एकमेकांची आठवण येते, असं शिवसेना खासदार संजय राऊत ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचे प्रकाशनावेळी म्हणाले. या वेळी राऊतांच्या या विधानावरून सभागृहात एकच हशा पिकला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या निवडक भाषणांचे ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी नेहरू सेंटर येथे झाले. या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना खासदार संजय राऊत आणि साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीचं तोंड भरुन कौतुक करत भाजपवर निशाणा साधला आहे
संजय राऊतांनी कवी सौमित्र यांच्या कवितेतील काही ओळींचा आधार घेत म्हणाले की, मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहाबघ माझी आठवण येते का? याप्रमाणे आता आम्हा तिन्ही पक्षांना दररोज एकमेकांची आठवण येते, असं म्हटल्यावर सभागृहात एकच हशा पिकला. पुढे ते म्हणाले की, हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणीइवलसं तळं पिऊन टाकबघ माझी आठवण येते का? याप्रमाणे आम्ही तिन्ही पक्षांनी एकमेकांसाठी हात लांब केले असं राऊत म्हणाले. एकुणच महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि तिन्ही पक्षांमध्ये काही वाद नाही आणि ही युती पुढेही टिकुन राहणार असं सांगण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केला आहे.