मुंबई (वृत्तसंस्था) अल्पसंख्याक मंत्री मलिक यांनी आता नवे ट्विट करत नवा चेहरा समोर आणला आहे. ही व्यक्ती कोण आहे? या व्यक्तीचे दाऊद वानखेडे आणि समीर वानखेडे यांच्याशी काय नाते आहे, याबाबत कृपया माहिती द्यावी, असे मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडेही मुस्लिम असल्याचा दावा त्यांनी केलाय.
ओळख लपवण्यासाठी समीर वानखेडेंनी भावोजीला तुरूंगात डांबण्याची धमकी दिली. समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीशी झालेल्या निकाह नाम्यातही अब्दुल अझीजचं नाव आहे, पण अब्दुल मूळचा सुरतचा असल्याचं ते म्हणालेत. ट्विट करत त्यांनी या प्रकरणात आणखी एक गंभीर आरोप केलाय.
यास्मिन खान हिचं खान अब्दुल अझीजसोबत लग्न झालंय. ओळख लपवण्यासाठी अब्दुल अझीजसोबत घटस्फोट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. अब्दुल अझीज सध्या इटलीमध्ये आहे, दोघांना एक १० वर्षांचा मुलगा असल्याची माहिती समोर येतेय. तसेच भारतात आल्यास तुरुंगात टाकेन, अशी समीर वानखेडेंकडून अब्दुल अझीजला धमकी दिल्याचाही दावा केला जात आहे.
कोण आहेत यास्मिन वानखेडे?
मलिक यांनी ज्यांचा लेडी डॉन असा उल्लेख केला. त्यांचं नाव यास्मिन वानखेडे असं आहे. यास्मिन वानखेडे या समीर वानखेडे यांच्या बहीण आहेत. यास्मिन वकील आहेत. त्या मनसेच्या चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षा असून मनसेचं कायदेशीर कामही पाहतात. तसेच त्या महिलांच्या विविध समस्या सोडवण्याचेही काम करतात, अशी माहिती यास्मिन वानखेडे यांनी दिली होती.
















