जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १०५९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे १०७४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज बावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १९०, जळगाव ग्रामीण-१२, भुसावळ- १६१, अमळनेर-२२, चोपडा-१३२, पाचोरा-६६, भडगाव-५२, धरणगाव-४२, यावल-६५, एरंडोल-६७, जामनेर-६८, रावेर-३९, पारोळा-३७, चाळीसगाव-३६, मुक्ताईनगर-०८, बोदवड-४९, इतर जिल्ह्यातील-१३ असे एकुण १०५९ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १०९ हजार २७७ पर्यंत पोहचली असून ९६ हजार १५३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज बावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १९३१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १११९३ रुग्ण सध्या उपचार घेताय.
दिलासादायक
जळगाव जिल्ह्यात आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या १५ ने जास्त.
ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ३७ ने झाली कमी.
चिंताजनक
जिल्ह्यात आज एकाच दिवसात २२ बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे.