मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना भवनाच्या बाहेर राज ठाकरेंचे एक पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर आता आता मनसेने देखील शिवेसना भवनासमोर पोस्टरबाजी केली आहे. शिवसेनेच्या कालच्या पोस्टरला मनसेने ‘काल आज उद्या’ या थीमवर बॅनर तयार करत शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मनसेनेही ‘काल आज उद्या’ या थीमवर बॅनर तयार करत शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मनसैनिक हा बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यासाठी निघाले होते. तेव्हाच पोलिसांनी हा बॅनर ताब्यात घेतला. मनसेला शिवसेना भवनासमोर हा बॅनर लावता आला नसला तरी त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘काल आज उद्या’ या मथळ्याखाली तयार करण्यात आलेल्या या फलकावर एका बाजूला उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो आहे. त्याच्यापुढे सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासोबतचा फोटो आहे. तर उद्या या रकान्याखाली असलेला भाग मोकळा सोडण्यात आला आहे. अशाप्रकारे मनसेने शिवसेनेला त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.