मुंबई (वृत्तसंस्था) छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण सुरू केले. कालच्या सभेला ते म्हणत होते मास्टरसभा मास्टरसभा पूर्ण भाषण ऐकल्यानंतर आमच्या लक्षात आलं लाफ्टर सभा लाफ्टर सभा.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेवर निशाणा साधला.
तसेच, “काल छत्रपती संभाजी महाराजांची देखील जयंती होती आणि भगवान नृसिंहाची देखील जयंती होती. स्वराज्याच्या रक्षणासाठी लढणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी पापींचं पोट फाडलं असे भगवान नृसिंह या दोघांची काल जयंत होती. आम्हाला वाटलं काही तेजस्वी, ओझस्वी ऐकायला मिळेल. काहीतरी असं बोललं जाईल की जे ऐकूण आम्ही हलून जाऊ. मात्र लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. त्याच गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. एकही नवीन गोष्ट आम्हाला ऐकयला मिळाली नाही.” असंही फडणवीसांनी बोलून दाखवलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (शनिवार) मुंबईत बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यानंतर आज (रविवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये हिंदी भाषी महासंकल्प सभा होत आहे. या सभेची सुरूवात सामूहिक हनुमान चालीसा पठणाने झाली. या सभेत फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत.