जळगाव (प्रतिनिधी) युवा सेनेतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उद्या शनिवार, दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात युवा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना ‘महाविद्यालयीन युवकांच्या विविध शैक्षणिक प्रश्नां’वर सुप्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ (मुंबई) हे बोलतं करणार आहेत.
या अनुषंगाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी https://forms.gle/wtrHYeJVYEcTUpV76 या गुगल फॉर्म लिंकवर जाऊन उपलब्ध फॉर्ममध्ये आपल्या मनातील प्रश्न आवर्जून नोंदवावा. आपल्या निवडक प्रश्नांवरही गाडगीळ हे मंत्री ना. उदय सामंत यांना बोलतं करून त्यासंदर्भातील ऊहापोह घडवून आणतील. ही मुलाखत जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाज यांच्या फेसबुक पेजवरही आपणास लाईव्ह पाहता येणार आहे. आपला एक प्रश्न आपल्या उच्च शिक्षणाची दिशा ठरविणारा नक्कीच ठरू शकतो. त्यामुळे आपण आवर्जून गुगल फॉर्मवर आपला प्रश्न उद्या, शनिवार, दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नोंदवावा. युवा संवादावेळी प्रथम येणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याने नियोजित वेळेपूर्वी आपण आवर्जून उपस्थिती द्यावी. असे आवाहन युवा सेना तसेच महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन यांनी केले आहे.
या संवादावेळी जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्री सुनिल महाजन, महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, युवा सेना कोअर कमिटी, मुंबईचे सदस्य रूपेश कदम, युवा सेना विभागीय सचिव, मालेगावचे आविष्कार भुसे, युवा सेना महाराष्ट्राचे सहसचिव विराज कावडिया, युवा सेना जळगाव जिल्हाप्रमुख शिवराज पाटील, युवा सेना जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, युवा सेना जळगाव जिल्हाप्रमुख पंकज राणे, आमदार व शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, शिवसेना जळगाव महानगरप्रमुख शरद तायडे, युवा सेना महानगर युवा अधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी यांच्यासह युवा सेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.