अमळनेर(प्रतिनिधी) केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाला आमदार अनिल पाटील यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दिला. तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांनी देखील आंदोलनाला भेट दिली.
शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घ्यावेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये ताब्यात घेणे तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली धक्काबुक्की, हाथरस मधील बलात्कार आणि खुनाची घटनेच्या निषेधार्थ हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते. सदर आंदोलनाला आमदार अनिल पाटील यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दिला. तसेच माजी आमदार साहेबराव पाटील यांनी देखील आंदोलनाला भेट दिली. यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना ताई वाघ, मा.कृ.उ.बा.संचालक प्रा सुभाष सुकलाल पाटील, डाॅ.अनिल शिंदे, कृ.उ.बा. संचालक सुरेश पाटील, धनगर पाटील, संदीप घोरपडे सर, भागवत गुरुजी, मुन्ना शर्मा, राजु शेख, प्रविण जैन, सईद तेली, भागवत सुर्यवंशी, राजु फाफोरेकर, गजेंद्र साळुंखे, गिरीश पाटील, कुंदन निकम, मनोज बोरसे, युवक तालुकाध्यक्ष महेश पाटील, मयुर पाटील, तौसिफ तेली आदी उपस्थित होते.
















