भुसावळ (प्रतिनिधी ) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील महिला मुक्ती मोर्चा संघटना व वंचित बहुजन आघाडी यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर गोरगरीबांसह अपंग बांधवाना ब्लैंकेट वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सौ. संगीता राजेंद्र भामरे, जिल्हा महासचिव विद्यासागर खरात, जिल्हा संघटक निलेश जाधव, जिल्हा महासचिव दिनेश ईखारे, जिल्हा महासचिव वंदना सोनवणे, बाळा पवार, शुभम सोयंके, गणेश जाधव, वनिता इंगळे, शबनम दीदी खान, सरिता नन्नवरे, जयश्री नन्नवरे आदीं उपस्थित होते .