साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या मनवेल येथे आमदार लताताई सोनवणे यांच्या निधीतून विठ्ठल मंदिराच्या परीसरात पेव्हर ब्लाँक बसविण्यासाठी निधी मंजुर झाला होता. या कामाचे भुमीपुजन होऊन ९ महिने झाले, मात्र कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.
सदर कामाचे जानेवारी २०२० मध्ये भुमीपुजन करण्यात आले होते. मात्र ठेकेदाच्या मनमानी कारभारामुळे अद्यापही कामाला सुरुवात झाली नसल्याचे दिसुन येत आहे. उन्हाळा संपला, पावसाळा संपला मात्र कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालीच नाही. भुमीपुजन करण्यात आले, त्यावेळी लावण्यात आलेला फलक देखील काही दिवसापासुन रातोरात गायब झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ‘भुमी पुजनाची झाली घाई कामाला मात्र ठाव ठिकाण नाही’, असे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. आमदार लताताई सोनवणे यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन संबधित ठेकेदाराला काम पूर्ण करण्यासाठी आदेश यावेत अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.














