जळगाव (वासिम खान) आज महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील जैनाबाद भागात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक सुनील महाजन, शिवसेना शहर प्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादीचे शरद तायडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
आज महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील जैनाबाद भागातील वाल्मिक नगरमधील वाल्मिक मंदिरात रक्तदान शिबीर संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. साधारण ३० तरुणांनी रक्तदान केले. यावेळी भगवानभाऊ तायडे, किशोरभाऊ बाविस्कर, निलेश तायडे, शुभम तायडे, मुन्ना सोनवणे, अजय सोनवणे, पंकज बाविस्कर, आकाश रायसिगे, रोहन सोनवणे, चतभुज सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी खडसे यांनी उपस्थित समाज बांधवाना वाल्मिकी जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.