जळगाव (प्रतिनिधी) अपंग युनिटवरील विशेष शिक्षकांच्या दरवर्षीच्या कागदपत्रे तपासणीविरूध्द अभिजीत पाटील आणी राजाभाऊ भुतेकर यांनी उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्यात आहेत. कागदपत्रे तपासणीला शिक्षकांचा आक्षेप नाही. मात्र २०१३ पासून कागदपत्रे तपासणी चालू आहे आणि इतक्या वर्षापासून झालेल्या तपासणीत नक्की काय निष्पन्न झाले? काही निष्पन्नच होत नाही तर या तपासण्या कशासाठी?, असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
आधीची प्राथमिक स्तरावरील योजना अपंग युनिट योजना माध्यमिक स्तरावर आली. त्यावेळी योजना बंद झाल्यामुळे प्राथमिक योजनेतील शिक्षकांना शासनाने इतर शाळांत सामान्य शिक्षक म्हणून सामावून घेतले. त्यांना कंत्राटी पध्दत मोडून सरळ सेवेत सामावून घेतले. त्यांना योजनेच्या कुठल्याच तांत्रिकबाबींमधे अडकविले नाही आणी त्या प्राथमीक शिक्षकांसोबत योग्य तो न्याय झाला. मग आता तीच योजना माध्यमिक स्तरावर २००९ ला चालू होऊन आज२०२० मध्ये बंदच आहे. माध्यमिकस्तरावरही योजना कधीची बंदच आहे. उच्च न्यायालयाने पुनर्स्थापनेचा आदेश दिलेला आहे म्हणून तांत्रिकदृष्ट्या योजना बंद असूनही शिक्षक योजनेत पुनर्स्थापित आहेत. लोकल स्तरावरील अधिकारी योजना बंद आहे हे मान्यच करीत आहेत.
त्यामुळेच योजना बंद असूनही काही विशेष शिक्षकांना कुठल्यातरी हेडखाली पगार म्हणून काहीतरी तुटपुंजी रक्कम मिळते तर काहींना काहीच मिळत नाही. याही गोष्टीला यावेळी स्पष्टपणे न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. योजनाच जर बंद आहे तर प्राथमिक स्तरावरील शिक्षकांचे जसे समायोजन केले तसे माध्यमिक स्तरावरील शिक्षकांचे समायोजन करण्यास कसला अडथळा आहे?. समान समायोजन मिळणे हा न्यायोचित हक्क झाला आहे आणी तो मिळावा इतकीच माफक अपेक्षा आहे.
सदरीला याचिका ॲड. राहुल पवार यांच्या मार्फत करण्यात आल्या आहेत. २०१४ पासून न्याय मागत आहोत. शिक्षण विभागाच्या स्वतः मुख्य सचिव वंदना कृष्णा मॅडमही कोर्टात हजर राहून गेल्या आणी त्यांनी प्राथमिक स्तरासारखेच सर्वसमावेषक धोरण आणू असं त्यावेळी सांगितले होते, मात्र अनेक शिक्षकांच्या अनेक याचिकांमुळे शासनाचा गोंधळ होतो आहे. त्यांच्या सर्वसमावेषक धोरण आणण्याच्या शब्दामुळे आणी धोरण सर्वांसाठीच असते त्यामुळे अनेक शिक्षकांच्या अनेक याचिका करणे थांबविले होते. पण दुर्दैवाने अजून कुठलेच धोरण आलेले नाही. त्यामुळे आता याचिका करून, स्पष्ट सांगून न्यायशमागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही,असे अभिजीत किशोर पाटील आणि राजाभाऊ देविदास भुतेकर यांनी म्हटले आहे.