चंदीगढ (वृत्तसंस्था) शेतकऱ्यांनी घेरल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न देता आल्यामुळे भाजपच्या एका आमदाराला घटनास्थळावरून पळ काढावा लागल्याचा आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मोदी सरकारने मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. इंद्री मतदारसंघाचे आमदार राम कुमार कश्यप यांना शेतकऱ्यांनी घेरत कृषी विधेयकांबद्दल प्रश्न विचारले. मात्र कश्यप यांना एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गराड्यातून कश्यप यांनी पळ काढला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये आमदार राम कुमार कश्यप शेतकऱ्यांसोबत बोलताना दिसत आहेत. शेतकरी आमची मतपेढी आहे. आमची मतं गमावू असे कोणतेही विधेयक आम्ही आणू का?,’ असा प्रश्न कश्यप यांनी शेतकऱ्यांना विचारला. यानंतर उपस्थितांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ते पाहून आमदारांनी तिथून पळ काढला.
















