नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात गेल्या २४ तासात ९६ हजार ४२४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या २४ तासात ११७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार देशातील करोनाबाधित रुग्णसंख्येने ५२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत देशात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८४ हजार ३७२ इतकी झाली आहे. भारतात सध्या ५२ लाख १४ हजार ६७८ करोनाबाधित रुग्ण आहेत. यामध्ये १० लाख १७ हजार ७५४ अॅक्टिव्ह केसेस असून ४१ लाख १२ हजार ५५२ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रात गुरुवारी २४ हजार ६१९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर २४ तासांमध्ये ३९८ मृत्यू झाले. राज्यात आत्तापर्यंत ८ लाख १२ हजार ३५४ रुग्ण बरे झाले आहेत.