अमळनेर (प्रतिनिधी) देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये १५ नोव्हेंबर शिक्षकेतर कर्मचारी दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के होते. यावेळी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 15 नोव्हेंबर हा दिवस शिक्षकेतर कर्मचारी दिवस म्हणून संपूर्ण राज्यात साजरा करण्यात आला त्याचे औचित्य साधून शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी एन.जी.देशमुख, संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांचा सत्कार शाळेतील शिक्षक आय.आर.महाजन, एस.के.महाजन, एच.ओ.माळी यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ईश्वर महाजन यांनी केले तर आभार प्रदर्शन एस.के.महाजन यांनी मानले.
















