धरणगाव (प्रतिनिधी) आज संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त शहरातील धरणीपुरा तिळवण तेली समाज, सुभाष दरवाजा प्रभाग तेली समाज आणि तेलाठी प्रभागातील तेली समाजाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते जि.प.सदस्य प्रतापभाऊ पाटील यांनी तीनही प्रभागातील तिळवण तेली समाज पंच मंडळ आणि समाज बांधवांची भेट घेऊन संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख पीएम पाटील, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन, नगरसेवक विजय महाजन,नगरसेवक वासुदेव चौधरी, सत्यवान कंखरे, नानाभाऊ धनगर, गोविंदा मनोरे, दिलीप बापू पाटील, संजय चौधरी, विजय महाजन, पवन महाजन, बुट्या पाटील, किशोर पाटील, रविभाऊ महाजन, बाळासाहेब जाधव, संतोष महाजन, कमलेश बोरसे, रवींद्र कंखरे, अविनाश चौधरी, वाल्मीक पाटील, हेमराज चौधरी, पापा वाघरे, मयूर मोरावकर, करण वाघरे आदी उपस्थित होते.