TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात एक लाख सदस्य नोंदणीचे केले आवाहन

vijay waghmare by vijay waghmare
May 17, 2025
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) “ना झुके हैं, ना बिके हैं, ना टूटे हैं, हम बाळासाहेब के चेले हैं, खुलकर लड़े हैं और खुलकर जिए हैं !” या जोशपूर्ण शायरीने सुरुवात करत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने आयोजित जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्राच्या संवाद मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जनतेच्या हृदयाशी जोडलेली आहे. शिवसेना म्हणजे चळवळ, शिवसेना म्हणजे जनतेच्या मनातील ताकद.” असे म्हणत त्यांनी उपस्थितांना आगामी नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणीकडे असलेल्या उदासीनतेवर त्यांनी खंत व्यक्त करत सांगितले, “शिवसेना ही केवळ निवडणूक जिंकण्याची यंत्रणा नाही. ती बाळासाहेब ठाकरे यांची चळवळ आहे. पदाधिकाऱ्यांनी ‘सामाजिक कार्य हाच श्वास’ या भावनेने समाजात काम करावं.” “मतदारसंघ निहाय संपर्क मोहिम राबवा, गट-गणनिहाय नियोजन करा. बूथ कमिट्या, महिला आघाडी, युवासेना यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्या सोपवा. किमान एक लाख कार्यकर्त्यांची विक्रमी नोंदणी करण्यासाठी कामाला लागा.” असे प्रभावी आवाहनही त्यांनी यावेळी केले.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

या संवाद मेळाव्याच्या सुरुवातीस शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख संदीप सुरळकर यांनी केले तर आभार उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे यांनी मानले.

यावेळी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी बोलताना सांगितले की, “गुलाबभाऊंनी जातीपातीच्या पलिकडे जाऊन विकासासाठी झटत नेतृत्व केलं. शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घ्यावी.” तसेच मुंबईप्रमाणे जळगाव ग्रामीणमध्येही लवकरच पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

यावेळी मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा प्रमुख संजय पाटील सर, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांनीही मनोगत व्यक्त केले.

यांचा झाला शिवसेनेत प्रवेश
ग्रामीण भागातील युवा नेतृत्व आकाश अनिल सोनवणे, रवींद्र पवार, अनिल राठोड, पंकज चव्हाण, ओम पवार, शुभम सोनवणे, दादू जाधव यांच्यासह वकील संघटनेचेसर्व ऍड. आशिष पाटील, धीरज पांडे , सावता माळी , प्रवीण येवले, उमेश सनंसे, भावेश सोनवणे, पंकज सवर्णे, कोमल काळे, पवन सोनी, चांगदेव दांडगे, हर्षल संत, राजेश हरणे, श्याम शिंदे, रवींद्र रडे या सर्व वकील मंडळींनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे भगवा रुमाल गळ्यात घालून स्वागत केले.

यांची होती उपस्थिती
मेळाव्यास उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, युवा सेनेचे विस्तारक किशोर भोसले, तालुका प्रमूख शिवराज पाटील, डी.ओ.पाटील, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, उप जिल्हा प्रमूख रवींद्र कापडणे, महानगर प्रमूख संतोषआप्पा पाटील, शहर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन ढाके, अनिल भोळे, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र सपकाळे, VJNT चे राजू पाटील, डॉ. कमलाकर पाटील, धोंडू जगताप, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अजय महाजन , रामकृष्ण काटोले, उपतालुका प्रमूख जितू पाटील, प्रमोद सोनवणे, प्रविण परदेशी, राजू पाटील कैलास चौधरी, समाधान चिंचोरे, महिला आघाडीच्या शितलताई चींचोरे, माजी सभापती ललिताताई कोळी, ज्योतीताई शिवदे, ज्योतीताई चव्हाण, मुरलीधर पाटील, गोपाल जीभाऊ, नवनाथ दारकुंडे, हर्षल मावळे, जितू गवळी, लाडकी बहिण अध्यक्ष अर्जुन पाटील, सुरेश भापसे, पि.के. पाटील, ब्रिजलाल पाटील आदींसह शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

साप्ताहिक राशिभविष्य 18 मे 2025 ते 24 मे 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : अपहरण करुन बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

April 30, 2024

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १५ ऑगस्ट २०२४ !

August 15, 2024

रियलटी चेक : जळगावकरांनो सावधान…‘जळगाव फिमेल एस्कॉर्ट’ एक गुलाबी धोका !

September 28, 2020

जळगावच्या शिव कॉलनीत घरफोडी : 26 हजारांच्या ऐवज लंपास !

July 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group