
धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव येथे दि. २२ नोव्हेंबर रोजी मराठा समाजाचा मेळावा, वधूवर परिचय, मंगल कार्यालय भुमीपुजन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी हजारो संख्येने समाज बांधव भगिनी उपस्थित होते.
मराठा समाजाच्या या मेळाव्याला महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश येथील समाज बांधव व माता भगिनी,उपवर वधूवर, गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले समाज बांधव, तसेच या कार्यक्रमासाठी खासकरून उपस्थित राहिलेले जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री,तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य ना. मा. भाऊसो श्री गुलाबराव जी पाटील, वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.भाऊसो श्री संजय जी सावकारे, जळगांव लोकसभेच्या खासदार स्मिता ताई वाघ, पाचोरा भडगाव विधानसभेचे आ. श्री किशोर अप्पा पाटील, जळगांव जिल्हा माजी पालकमंत्री मंत्री श्री गुलाबराव जी देवकर , चाळीसगांव चे आ. मंगेश दादा चव्हाण, धरणगांव लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ लिलाताई सुरेश चौधरी, धानोरा सरपंच श्री भगवान भाऊ महाजन, प्रबोधनकार ह.भ.प.श्री समाधान महाराज भोजेकर, जीएसटी कमिशनर श्री राजेशजी जाधव साहेब, मराठा उद्योजक श्री आनंदराव मराठे, दक्षिणी क्षत्रिय मराठा समाजातील प्रमुख मान्यवर , कार्यक्रमाच्या माजी पंचायत समिती सभापती धरणगाव अध्यक्ष्या सौ सुरेखा अनिल पाटील हे लाभले होते सर्व सन्माननीय नवनियुक्त नगरसेवक, व सरपंच विविध राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर,वैवाहिक तंटामुक्ती समिती, सर्व सन्माननीय मराठा समाजाचे आजी माजी अध्यक्ष व संचालक मंडळजळगांव… गावोगावातील सर्व अध्यक्ष व संचालकमंडळ, जगतगुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था चिंचपुरा,संत कृपा वारकरी संस्था धरणगाव, समाजाचे भाट उपस्थित सुद्धा होते.
या कार्यक्रमासाठी समाजाचे विद्यमान अध्यक्ष तसेच त्यांचे सर्वच संचालक व माजी अध्यक्ष श्री भानुदासजी पाटील व त्यांच्या सर्व संचालक मंडळाने परिश्रम घेतले.स्थानिक धरणगाव मराठे गल्ली येथील मराठा समाज पंच मंडळ ,लहान मराठे गल्ली येथील मराठा समाज मंडळ, एरंडोल गांधीपुरा समाज मंडळ, जळगाव येथील महिला मंडळ ,युवा मंडळ परिसरातील खेडो पाड्यातील समाज बांधव यांनी विशेष व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.
या वेळी राजमाता जिजाऊ मराठा समाज मंगल कार्यालयाच्या जागेचे भुमीपुजन व वधूवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन पालक मंत्री मा.ना.भाऊसो श्री गुलाबराव जी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री व वस्त्र उद्योग मंत्री, खासदार आमदार यांनी एका वर्षात मंगल कार्यालयिचे काम पूर्ण केले जाईल व त्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल असे सांगितले. या वेळी अनेक मुलीमुलांनी आपला परिचय देऊन भावी जोडीदाराबाबतीत इच्छा व्यक्त केली. तसेच समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद करणे, साखरपुडा, मेहंदी, प्रिविडींग,अंत्यविधीच्या वेळी भाषणे करणे बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. मेळाव्यात उपस्थित सर्व महिलांना केंद्रीय जलशक्ती मंत्री खासदार मा.ना.श्री सी आर पाटील साहेब गुजरात यांच्या कडून महिलांना दिवाळी भेट वस्तू दिल्यात कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज अध्यक्ष सोमनाथ मराठे यांनी केले तर सुत्रसंचलन समाजातील शिक्षिका व शिक्षक यांनी केले सर्वांचे आभार संचालक श्री पी के पाटील यांनी मानले













