TheClearNews.Com
Tuesday, July 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

vijay waghmare by vijay waghmare
July 7, 2026
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील सुमारे दोन लाख ग्राहकांकडे थकीत 177 कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. मागील जून महिन्यात वीजबिल थकबाकीमुळे 57 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता आणि संपूर्ण रकमेचा भरणा केल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तरी ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जळगाव परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील एकूण 1 लाख 87 हजार 524 ग्राहकांकडे 177 कोटी 69 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यापैकी जळगाव मंडलातील 1 लाख 8 हजार 624 ग्राहकांकडे 96 कोटी 57 लाख, धुळे मंडलातील 56 हजार 776 ग्राहकांकडे 60 कोटी 66 लाख व नंदुरबार मंडलातील 22 हजार 124 ग्राहकांकडे 20 कोटी 47 लाख रुपयांची थकबाकी आहे.

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

थकबाकी वसुलीसाठी जळगाव परिमंडलातील जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलात महावितरणतर्फे धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी सरसावले आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. तर जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. मागील जून महिन्यात जळगाव मंडलातील 36 हजार 821, धुळे मंडलातील 13 हजार 376 व नंदुरबार मंडलातील 7 हजार 134 ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. यामध्ये 5 हजार रुपयांवरील थकबाकीदारांचे सध्याचे मीटर व सर्व्हिस वायर काढून घेण्यात येणार आहे. यानंतरही ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरताना आढळला तर त्याच्यावर कायदेशीर पोलिस कारवाई करण्यात येत आहे. तरी जळगाव परिमंडलातील सर्व ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिले भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

वीजबिल भरण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध

वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह विविध ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन करून वीजबिल भरता येते. महावितरण मोबाईल ॲप, www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच विविध यूपीआय ॲपद्वारे घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरता येते. वेळेत ऑनलाईन वीजबिल भरल्यास 0.25 टक्के सूटही मिळते. गो-ग्रीन योजनेअंतर्गत ई-वीजबिल पर्याय निवडल्यास एकरकमी 120 रुपये सूट मिळते तसेच महावितरणच्या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केल्यास ऑनलाईन वीजबिल भरण्याचे पर्याय उपलब्ध होतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPower supply of 57 thousand defaulters cut off Mahavitaran accelerates electricity bill recovery campaign

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026
गुन्हे

गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेसात लाखांचा गंडा

July 19, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
Next Post

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यास परवानगी !

October 27, 2020

अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आले प्रताप पाटील !

August 15, 2022

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सल्लागारपदी वैशाली विसपुते

November 26, 2020

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य : २२ ते २८ मे २०२२ जाणून घ्या… तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा?

May 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group