TheClearNews.Com
Thursday, November 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या अभय योजनेत जळगाव परिमंडलातील ३ लाख ९२ हजार ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी!

संपूर्ण व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ

vijay waghmare by vijay waghmare
November 19, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव/धुळे/नंदुरबार (प्रतिनिधी) – कायमस्वरूपी तसेच तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्चदाब व लघुदाब ग्राहकांसाठी महावितरणतर्फे ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जळगाव परिमंडलातील तब्बल ३ लाख ९२ हजार २५५ थकबाकीदार ग्राहकांना घेता येणार आहे. ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची ही मोठी संधी असून, पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेऊन थकबाकीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, असे आवाहन मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
अभय योजना ६ नोव्हेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत लागू राहणार आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर बिगरकृषी ग्राहक तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक या योजनेसाठी पात्र आहेत. शेती व सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत ग्राहकांच्या एकूण थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार शंभर टक्के माफ करण्यात येणार आहे. याशिवाय, उर्वरित मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास त्यामध्ये आणखी १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तसेच थकबाकी हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के डाउन पेमेंट भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांमध्ये भरता येईल, तर उच्चदाब ग्राहकांसाठी तीन ते सहा हप्त्यांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी वीजपुरवठा पुनर्जोडणीच्या वेळी प्रीपेड मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. अशा ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क आणि सर्व्हिस कनेक्शन शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
जळगाव परिमंडलात कायमस्वरूपी व तात्पुरता वीजपुरवठा खंडित असलेल्या पात्र ग्राहकांकडे सुमारे २९० कोटी ८८ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना सुमारे ६३ कोटी ६६ लाख रुपयांचे व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. याशिवाय, मूळ थकबाकीच्या एकरकमी भरण्यावर १० ते २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार असल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यातील १ लाख ९८ हजार ९६० ग्राहकांकडे १७१ कोटी ३५ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना ४६ कोटी ३३ लाख रुपये विलंब आकार व व्याज माफ होणार आहे. धुळे जिल्ह्यातील ९१ हजार ४६० ग्राहकांकडे ५७ कोटी ६७ लाख रुपयांची मूळ थकबाकी असून, त्यांना ८ कोटी ७४ लाख रुपये व्याज व विलंब आकारातून शंभर टक्के सवलत मिळणार आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील १ लाख १ हजार ८३५ हजार ग्राहकांकडे ६१ कोटी ८६ लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या ग्राहकांना ८ कोटी ५९ लाख रुपये व्याज व विलंब आकार माफ होणार आहे.

‘अभय योजना २०२६-२७’मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना महावितरणच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरून किंवा मोबाईल ॲपद्वारे योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन व्याज व विलंब आकाराच्या मोठ्या आर्थिक सवलतीचा फायदा घ्यावा आणि थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

READ ALSO

दोन दिवसांपूर्वीच घरी आलेल्या तरुणाचा पाठीत चॉपर खूपसून निघृण खून

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonOpportunity for 3.92 lakh consumers in the Jalgaon zone to clear their outstanding dues under MSEDCL’s ‘Abhay Yojana’ (Amnesty Scheme)!

Related Posts

गुन्हे

दोन दिवसांपूर्वीच घरी आलेल्या तरुणाचा पाठीत चॉपर खूपसून निघृण खून

November 19, 2026
जळगाव

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

November 18, 2026
जळगाव

महावितरणच्या प्रगतीत लेखा विभागाचे मोलाचे योगदान

November 18, 2026
जळगाव

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
गुन्हे

शिवाजीनगरात तरुणाच्या घरासमोर हवेत दोन राऊंड फायर

November 18, 2026
जळगाव

केवळ १०.७८ लाख रुपये भरून ग्राहकाने मिळवली २३.८४ लाखांची सवलत!

November 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : मागील २४ तासांत ९० हजार ६३३ करोनाबाधित रुग्ण

September 6, 2020

नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

December 30, 2021

इलेक्ट्रिक पोलवरील विद्युत तारांची चोरी करणाऱ्या तिघांना एरंडोल शहरातून अटक !

October 9, 2024

अनोरे विद्यालयात विद्यार्थी झाले लसवंत

January 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group