
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे माजी अध्यक्ष अनंत भोळे यांची रोटरीच्या वर्ष २०२७-२८ साठी असिस्टंट गव्हर्नरपदी निवड झाली आहे. रोटरीचे नियोजित गव्हर्नर किशोर राठी यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.
या पदाच्या माध्यमातून भोळे हे जळगावातील रोटरी क्लब आणि जिल्हा प्रशासन (डिस्ट्रिक्ट) यांच्यात समन्वय साधण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार आहेत.
अनंत भोळे यांनी यापूर्वी रोटरीमध्ये क्लब सचिव, क्लब अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट सहाय्यक सचिव आणि संचालक अशा विविध पदांवर काम केले आहे. रोटरीच्या माध्यमातून त्यांनी संघटनात्मक आणि सामाजिक कार्याचा अनुभव संपादन केला आहे. ते जळगाव येथील मृदंग इंडिया या जाहिरात संस्थेचे संचालक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल रोटरी परिवारासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.
















