
जळगाव (प्रतिनिधी) – दुचाकीवरुन तलवारी घेवून आलेल्या टोळक्याने केयूर पंधारे (रा. शिवाजी नगर) या तरुणाच्या घरासमोर हवेत गोळीबार केला. ही घटना मंगळवार दि. १७ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी रिकामी पुंगळी मिळून आली नाही, मात्र परिसरातील नागरिकांनी गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला असून दोन वेळा फायर झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी गोळीबार झालेल्या घरावर लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यावरुन संशयित हल्लखोरांच्या कसून शोध घेतला जात आहे.
शहरातील शिवाजी नगरातील क्रांती चौकात केयूर पंधारे हा तरुण वास्तव्यास आहे. त्याचे वडील महापालिकेत नोकरीस असून ते ड्युटीवर होते तर केयूर हा તુ बाहेर गेलेला होता. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन सहा ते सात तरुण त्याच्या घराजवळ हातात धारदार तलवारी घेवून आले. त्यांनी पंधारे यांच्या घरासमोर त्यांच्याजवळील गावठी कद्वयातून हवेत दोन राऊंड फायर केले. त्यानंतर संशयित टोळके घटनास्थळहून पसार झाले. गोळीबार झाल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ माजून गेली असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांची घटनास्थळी पाहणी घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दीपक जगदाळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी काडतूसांचा शोध घेतला जात होता. त्यानंतर फॉरेन्सीकच्या पथकाने देखील घटनास्थळहून काडतूसांचा शोध घेवून पंचनामा करण्यात आला.
दोन वेळा फायरिंगमुळे परिसरात भितीचे वातावरण
शहराच्या मध्यवर्ती भागात हवेत दोनवेळा गोळीबार झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबाराच्या घटनेला पोलिसांनी देखील दुजोरा दिला असून पुढील तपास सुरू आहे.
हातात तलवारीसह कट्टा घेवून आले हल्लेखोर
ज्या तरुणाच्या घरावर गोळीबार झाला त्याच्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. पोलिसांनी गोळीबार करण्यासाठी आलेल्यांचे फुटेज ताब्यात घेतले. यामध्ये टोळक्याच्या हातात तलवारी आणि गावठी कट्टा असल्याचे दिसत आहे. दरम्यान, त्याच्या आधारावर पोलिसांकडून संशयित टोळक्याचा शोध घेतला जात असून त्यांच्या शोधार्थ पथके देखील रवाना झाली आहे.
वाळूसह पैशांच्या वादातून झाल्याची चर्चा
टोळक्याकडून झालेला गोळीबार हा वाळूच्या वादातून फोनवरुन एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर एका टोळके हातात तलवारी घेवून थेट पंधारे यांच्या घरासमोर आले. आणि दहशत माजविण्यासाठी त्यांनी हवेत दोनवेळा गोळीबार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते
















