TheClearNews.Com
Wednesday, November 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्य नाट्य स्पर्धा : जळगावकर नाट्यरसिकांना मिळणार नाट्यप्रयोगांची मेजवानी

जळगांव येथे २२ नोव्हेंबरपासून ६५ व्या राज्य नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ

vijay waghmare by vijay waghmare
November 18, 2026
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

महावितरणच्या प्रगतीत लेखा विभागाचे मोलाचे योगदान

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

जळगाव (प्रतिनिधी) : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या जळगाव केंद्रावरील प्राथमिक फेरीसाठी नाट्यसंस्थांच्या तालमींना जोरदार सुरुवात झाली आहे. शहरातील महाकवी कालिदास सभागृह मनभावन इमारत, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, एकलव्य क्रीडा संकुलसमोर, जळगाव येथे दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ पासून या स्पर्धेला प्रारंभ होणार असून, दररोज सायंकाळी ७ वाजता नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे जळगाव व परिसरातील नाट्यरसिकांना दिवाळीनंतर दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्राला समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच हौशी कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी राज्य नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून विविध नाट्यसंस्थांमधील कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांना आपली कलाकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या नियोजनानुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीच्या स्पर्धेत जळगाव, नंदुरबार व इंदोर जिल्ह्यातील एकूण १५ नाट्यसंस्था प्राथमिक फेरीत सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या तयारीसाठी कलाकार आपापल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून तालमी करत आहेत. संवादफेक, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा आणि रंगमंचावरील हालचाली यांचा कसून सराव सुरू आहे.
यंदाच्या स्पर्धेत विविध विषयांवरील नाटके सादर होणार असल्याने प्रेक्षकांना वेगवेगळ्या आशयांचे आणि नाट्यशैलींचे दर्शन घडणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी नाट्यसंस्थांमध्ये कलात्मक चुरस पाहायला मिळणार असून, कलाकारांच्या मेहनतीचा आणि सर्जनशीलतेचा अनुभव नाट्यरसिकांना घेता येणार आहे.
महाकवी कालिदास सभागृह
मनभावन इमारत, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, एकलव्य क्रीडा संकुलसमोर, जळगाव येथे होणाऱ्या या स्पर्धेतील नाट्यप्रयोगांना नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हौशी कलाकारांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonState Drama Competition: Theatre enthusiasts in Jalgaon to be treated to a feast of plays

Related Posts

जळगाव

महावितरणच्या प्रगतीत लेखा विभागाचे मोलाचे योगदान

November 18, 2026
जळगाव

अनंत भोळे यांची रोटरीच्या असिस्टंट गव्हर्नरपदी निवड

November 18, 2026
गुन्हे

शिवाजीनगरात तरुणाच्या घरासमोर हवेत दोन राऊंड फायर

November 18, 2026
जळगाव

केवळ १०.७८ लाख रुपये भरून ग्राहकाने मिळवली २३.८४ लाखांची सवलत!

November 17, 2026
गुन्हे

शिलाई मशिनचे आमिष दाखवून ९० महिलांना गंडा; ३ लाख १० हजारांची फसवणूक!

November 17, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये कत्तलखान्यावर पोलिसांची धाड; ५७० किलो मांसासह २८ हत्यारे जप्त!

November 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंबेडकर जयंती मिरवणूकीतून परताना दुर्दैवी घटना ; वीजेच्या झटक्याने दोघांचा मृत्यू, अन्य जखमी !

April 14, 2023

आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या किरणकुमार बकालेची धुळे कारागृहात रवानगी !

January 18, 2024

पंतप्रधान मोदींना भाऊ म्हणणाऱ्या कार्यकर्तीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू

December 22, 2020

धरणगावचे माजी नगरसेवक अहमद पठाण यांचा शिंदे गटात प्रवेश ; ठाकरे गटाला सलग दुसरा जबर धक्का !

October 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group