
मेष – आजचा दिवस यश आणि नवीन संधी घेऊन येईल. अनेक दिवसांपासून रखडलेले महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि अनोळखी व्यक्तींवर अति विश्वास ठेवणे टाळा.
वृषभ – नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची आकर्षक संधी मिळू शकते. मात्र कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भविष्याचा विचार करा. वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने कामाचा उत्साह वाढेल. अचानक खर्च उद्भवण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजनाकडे लक्ष द्या.
मिथुन – आज आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. पैशांच्या देवाणघेवाणीत निष्काळजीपणा टाळा. जुन्या मित्राची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. जोडीदारासाठी एखादे सरप्राइज प्लॅन करू शकता. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
कर्क – आज आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याचे संकेत आहेत. मुलांच्या वागण्यामुळे काहीशी चिंता वाटू शकते. रागावर नियंत्रण ठेवा आणि भावंडांसोबतचे जुने मतभेद चर्चेतून मिटवण्याचा प्रयत्न करा. सरकारी कामातील अडथळे दूर होऊन दिलासा मिळू शकतो.
सिंह – आज कामाचा व्याप वाढणार असून अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. व्यवसायात नवीन व्यक्तीसोबत भागीदारीची संधी मिळू शकते. विवाहाशी संबंधित रखडलेली कामे मार्गी लागतील. मात्र आर्थिक अडचणींसाठी कर्ज घेणे टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.
कन्या – आज प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या शिस्तीचे आणि कार्यपद्धतीचे कौतुक होईल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना नवीन जबाबदारी किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे. प्रवासात घाई करू नका.
तूळ – आज आर्थिक बाबतीत संतुलन राखणे गरजेचे आहे. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक प्रश्न बाहेरील व्यक्तींच्या सल्ल्याने सोडवण्याऐवजी आपापसांत चर्चा करा. कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा टाळा.
वृश्चिक – आजचा दिवस आनंदाचा आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. दूर राहणाऱ्या जवळच्या व्यक्तीची अचानक भेट होण्याची शक्यता आहे. घराच्या सजावटीवर किंवा दुरुस्तीवर खर्च होऊ शकतो. आर्थिक अडचणी दूर होऊन रखडलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या निर्णयात आईचा सल्ला घ्या.
धनु – आज प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होण्याचे संकेत आहेत. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. मुलांच्या यशामुळे आनंद मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मकर – आज तुमच्या मेहनतीचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील. सरकारी कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र तुमच्या प्रगतीमुळे काही लोक नाराज होऊ शकतात. त्यामुळे कोणावरही अति अवलंबून राहू नका.
कुंभ – आज कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधानाचे वातावरण राहील. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. जोडीदाराच्या करिअरमध्ये प्रगती होण्याचे संकेत आहेत. भावंडांचा सल्ला महत्त्वाच्या निर्णयात उपयोगी ठरेल. जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी वाटू शकते.
मीन – आज प्रत्येक काम विचारपूर्वक करा. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा आणि बोलताना संयम बाळगा. अविवाहितांच्या आयुष्यात प्रेमाची नवीन सुरुवात होऊ शकते. व्यवसायातील गुंतवणूक आणि भागीदारी करताना सर्व बाबी तपासून घ्या.













