TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एकाच वेळी १०८ देशांसह भारतात ६००० ठिकाणी नवकार महामंत्राचा जप; जळगावातून 81 हजार जणांची विश्व शांती साठी प्रार्थना

vijay waghmare by vijay waghmare
April 9, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)- ‘एक मन, एक व्यक्ती, एक चेतनेतून नवकार मंत्राची अनुभूती ही अध्यात्मिक शक्तीची प्रचिती आहे. विश्व नवकार दिना निमित्त पाणी बचत, वृक्षारोपण, स्वच्छता, स्वदेशी वस्तूंचा वापर, भारत दर्शन, सेंद्रीय शेती, हेल्दी लाईफ स्टाईल, योग व खेल कूद आणि गरिबांसाठी सहाय्य या नऊ संकल्पातून मानवतेसह सृष्टीचे संवर्धन करूया.!’ असा मोलाचा संदेश देत, विश्वात भारताचा प्रभाव जैन धर्मामूळे वाढला आहे. हे मी खात्री सांगू शकतो. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोगत व्यक्त केले.

जळगाव येथे जितो तर्फे आयोजित सर्व धर्मीय बंधू-भगिनींसाठी विश्व नवकार महासंमेलनामध्ये दिल्ली येथील विज्ञानभवनातून ऑनलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग नोंदविला. ‘विश्व कल्याणासाठी एकत्र येऊया आणि नवकार महामंत्राचा सामूहिक जप करून शांती आणि सद्भावनेचा संदेश देऊया !’ या उद्देशाने विश्वशांतीसाठी सामुदायिक नवकार महामंत्र जप जळगावातील 81 हजार जणांनी एकाच वेळी केला. यात जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूडस् लि. कंपनीने संस्थात्मक स्तरावर ११ हजार सदस्यांची नोंदणी केली होती. जळगावस्थित मुख्य आस्थापनांमधील सहकाऱ्यांनी सामुदायिक नवकार मंत्राचे पठण केले. एकाच वेळी १०८ देशांमध्ये आणि भारतातील ६००० ठिकाणी हा शांतीमंत्र गुंजला. जळगाव येथील कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व धर्म बांधवांची उपस्थिती होती. यात महिला-पुरूष तसेच युवक-युवती व शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील घेताल सहभागी होते

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

खान्देश सेंट्रल मॉल येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाप्रसंगी व्यासपिठावर संघपती दलिचंदजी जैन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, राजेंद्र मयूर, प्रदीप रायसोनी, रमेशदादा जैन, माजी आमदार मनिष जैन, डॉ. गुरूमूख जगवाणी, महामंडलेश्वर जनार्दन महाराज, मुफ्ती हारून, मौलाना मुफ्ती खालीद नदवी, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, शोभना जैन, डॉ. केतकी पाटील, मिनाक्षी जैन, नयनतारा बाफना, ॲड. सुशील अत्रे, श्रीराम पाटील, युसूफ मकरा, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, पवन सामसुखा, अनिल कोठारी, अजय गांधी, शशी बियाणी, अभिषेक राकेचा, राजेश जैन, ललित लोडाया, प्रविण पगारीया, JITO जळगावचे अध्यक्ष सुभाष लोढा, चीफ सेक्रेटरी प्रशांत छाजेड, प्रोजेक्ट चेअरमन विनय पारख यांच्यासह जैन मुनी व सर्व धर्मीयांचे गुरू व प्रमुख व्यक्ति उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरवातीला दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर मंगलमय नवकार मंत्राचे पठण करण्यात आले.

यानंतर ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व धर्मीय समाज बांधवांशी संवाद साधला. जैन धर्म, संस्कृती विषयी त्यांनी भाष्य केले. जन्माला आलेल्या प्रत्येक शरीराच्या अवतीभोवती जैन धर्मीयांचा प्रभाव कमी अधीक प्रमाणात दिसून येतो. प्रत्येकाचे आस्थेचे केंद्र म्हणजे नवकार महामंत्र होय. तेच जीवनाचे मूळ आहे. फक्त त्याची स्वत: ला जाणिव झाली पाहिजे. मानवतेचे स्मरण यात असून ज्ञान व कर्म हे जीवनाची दिशा देतात तर गुरू प्रकाश दाखवितात आणि सृष्टी संवर्धनाचा मार्ग नवकार मंत्रातून मिळतो. स्वत: च्या मनातील नकारात्मक विचार, अविश्वास, वैमनस्य, स्वार्थ हे मानवतेचे क्षत्रु असून त्यावर विजय पाहिजे असेल तर अरिहंत मार्गाने स्वत: ला जिंकले पाहिजे. अनेकांतवाद स्वीकारला पाहिजे. पर्यावरणातील बदल, आतंकवाद आणि युद्ध हे मानवावरील संकट असून त्याला कायम स्वरूपी उपाय म्हणून सादगी, संयम आणि शाश्वता ही नव पिढीवर संस्कारीत झाली पाहिजे ती जैन धर्माच्या नवकार मंत्रातून होत आहे. नवकार मंत्र हा केवळ मंत्र नसून एक मन शांतीचा आणि नवी दिशा देण्याचा मंत्र असल्याचे मनोगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवकार महामंत्र जप कार्यक्रमात व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी देवश्री वैराग्यरत्न सागर सुंदरजी महाराज साहेब यांनी नवकार मंत्राच्या महिमेबद्दल माहिती दिली. सत्संगाच्या माध्यमातून पंच महाभूतांशी जोडण्याचा मार्ग म्हणजे नवकार मंत्र होय त्यासाठी कृतज्ञता भाव आवश्यक असल्याचे महाराज साहेब म्हणाले. अनुत्तर सागरजी यांनी सुद्धा जीनवाणी द्वारे नवकार मंत्र जप चे महत्त्व सांगितले.

विनय पारख यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत छाजेड यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी जीतो च्या सर्व पदाधिकारी व जैन समाज बांधवांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
Next Post

जळगावात उद्यापासून भरणार तीन दिवसीय खान्देश करिअर महोत्सव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शालेय क्रीडा स्पर्धा सुरु करण्यासाठी क्रीडामंत्री ना.महाजन यांना निवेदन

August 29, 2022

अल्पवयीन मुलांना घेऊन करायचा दुचाकी चोरी ; एकाला अटक !

August 4, 2022

जळगावात धाडसी चोरी ; दीड लाखांचा ऐवज लंपास !

October 26, 2022

मुख्यमंत्री ठाकरे उच्च न्यायालयातील न्यायमुर्तींच्या भेटीला ; नगरपालिका, जि.प. निवडणुकी संदर्भात चर्चा ?

May 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group