TheClearNews.Com
Sunday, November 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने टाकला दुसऱ्यांदा दरोडा; ग्रामस्थांच्या मदतीने चारही दरोडेखोर काही तासात जेरबंद

vijay waghmare by vijay waghmare
November 1, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – बंदुकीचा धाक दाखवत तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोंडाला मास्क लावून आलेल्या चार जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. बँकेतील लॉकरमधील रोकड व सोने असा कोट्यावधी रुपयांचा ऐवज सहा बॅगांमध्ये भरून दरोडेखोर दोन दुचाकीवरून पसार झाले. तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पळून जाणाऱ्या दरोडेखोरांचा पाठलाग करीत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सुमारे १५ लाख रुपये रोकड व ६ बॅग सोने जप्त केले आहे. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भोकर गावात घडली.

तालुक्यातील भोकर येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तोंडाला मास्क आणि हेलमेट घालून चार संशयितांनी आत प्रवेश केला. त्यांच्याजवळ असलेल्या एअरगनचा धाक दाखवित त्यांनी बँकेत असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकाविले. दरम्यान, बँकेतील मॅनेजर आणि कॅशीरला लॉकरच्या चाब्या सोबत घेवून लॉकरकडे घेवून जात असतांना सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला. मात्र एका दरोडेखोराने सुरक्षरक्षकाच्या दिशेने पायाजवळ हवेत फायर केला. त्यानंतर बंदुकाची धाक दाखवत त्यांना लॉकर उघडण्यास सांगितले. त्या वेळी बँकेतील १६ लॉकरमधील सोने आणि सुमारे १५ लाख रुपयांची रोकड बॅगमध्ये भरून चारही जण दोन विना क्रमांकाच्या स्पोर्ट दुचाकींवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळतातच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बँकेत जाऊन पाहणी करीत घटनेची माहिती
जाणून घेतली. तोंडाला चिकटपट्टी लावून ठेवले कोंडून
दरोड्याच्या घटनेवेळी बँकेत अधिकारी, कर्मचारी मिळून ६ जण आणि एक सुरक्षा रक्षक असे सात जण होते. दराडा टाकल्यानंतर संशयितांनी सर्वांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले. ऐवज घेवून पळून जात असतांना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी बँकेत धाव घेत त्यांची सुटका करीत घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

गावात चादर विक्रीच्या बहाण्याने केली रेकी

दरोडा टाकण्यापुर्वी चार पैकी एका संशयिताने भोकर गावात चारद विक्रीच्या बाहण्याने येवून रेकी केली. गावातील रस्त्यांसह तेथे असलेल्या इतर माहिती समजल्यानंतर त्यांनी शनिवारी बँकेत सशस्त्र दरोडा टाकला. त्यांच्याजवळ असलेल्या एअरगनचा धाक दाखवित त्यांनी चार दरोडेखोरांपैकी २ जणांनी मॅनेजर आणि कॅशियर यांना बंदुकीचा धाक दाखवत लॉकर उघडण्यास सांगितले. त्यावेळी १६ लॉकर उघडून त्यातील सोने व जवळपास १५ लाख रुपयांची रोकड बॅगांमध्ये भरून ते बँकेबाहेर पडले व दोन दुचाकीवरून पसार झाले.

दरोड्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ उपनिरीक्षक भोकर येथील दरोड्याच्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार

हा पोलीस दलातून बडतर्फे पोलिस उपनिरीक्षक शंकर जासक हा असल्याचा पोलिसांना संशय आहे. मुंबई येथे कार्यरत असतांना त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. या कालावधीत तो आर्थीक विवंचनेत असल्यामुळे त्याने सन २०२३ मध्ये शालकाच्या मदतीने शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँकेत दरोडा टाकून ३.१७ कोटी रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. त्या गुन्ह्यात तो जिल्हा कारागृहात होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा स्टेट बँकेत दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांचा ऐवज लुटला. मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे तो काही वेळताच जेरबंद झाल्याने त्याचा हा प्रयत्न देखील फसला.

ट्रॅक्टर आडवे लावून दरोडेखोरांना रोखले

दरोड्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी दुचाकीवरून चोरट्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला किनोदजवळ एका चोराला टामी मारली, मात्र ती त्याने चुकविली, त्यानंतर रिघूरजवळही रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर डिकसाईजवळ रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लागल्याने चोरटा शेतात घुसला आणि तेथे ग्रामस्थांच्या तावडीत सापडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील हे घटनास्थळी पोहोचले. या घटनेसंदर्भात जिल्हाभरातील पोलिस यंत्रणेला अॅलर्ट करण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonArmed Robbery at State Bank in Bhokar

Related Posts

जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 01 नोव्हेंबर ते 07 नोव्हेंबर 2026 !

November 1, 2026
जळगाव

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

October 31, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित संकल्प शपथ वाचन

October 31, 2026
जळगाव

अटलांटा कंपनीला वाचवण्यामागे कोण? जळगावकरांच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल! – अरविंद देशमुख

October 31, 2026
गुन्हे

फैजपूरमध्ये बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

October 31, 2026
जळगाव

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी ॲड. वसंतराव भोलाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

October 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : महावीर जैनच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण ; जामिनाला सरकार पक्षाचा विरोध !

March 31, 2021

Weekly Horoscope : रविवार 24 मार्च ते शनिवार 30 मार्च 2024 !

March 24, 2024

पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबला लाच स्विकारतांना अटक !

June 10, 2021

महापौर जयश्री महाजनांच्या घरावर हल्ला : 43 जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

September 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group