
अमळनेर(प्रतिनिधी):- येथील खानदेश शिक्षण मंडळाचे जी.एस.हायस्कूल येथे देशाचे पहिले गृहमंत्री स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर एन सी सी कॅडेट यांनी संकल्प शपथ वाचन केले. यावेळी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.
येथील ४९ एन सी सी महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल अमित राय व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पिनाकी बनिक यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्हि.एम.पाटील,आर.जे.पाटील,क्रीडा शिक्षक जे. व्ही. बाविस्कर व शाळेचे एन सी सी ऑफिसर एस. ए. बनछोडे उपस्थित होते.
















