
जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर यांच्या वतीने दिनांक ४ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी उद्यान येथे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत आर. आर. विद्यालयातील वक्तृत्व स्पर्धेसाठी ९ विद्यार्थी सहभागी झालेभारतीय जनता पार्टी जळगाव महानगर आयोजित वकृत्व स्पर्धेत आपल्या आर आर विद्यालयातील कुमारी संस्कृती शशिकांत फेगडे इयत्ता दहावी अ या विद्यार्थिनीला तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम अकराशे रुपये पारितोषिक प्राप्त झाले तसेच कुमारी दिव्या हरिश्चंद्र बडगुजर आठवी अ या विद्यार्थिनीला उत्तेजनार्थ रोख रक्कम पाचशे रुपये पारितोषिक प्राप्त झाले. सदरील स्पर्धा चार ऑक्टोंबर महात्मा गांधी उद्यान येथे झाले
विद्यार्थिनीला तृतीय क्रमांकाचे रोख रक्कम अकराशे रुपये ,वक्तृत्व स्पर्धेसाठी सामाजिक व राष्ट्रीय विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना, भावना व सामाजिक तसेच राष्ट्रीय विषयांवरील विचार विचारांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सुंदर, कल्पक व आशयपूर्ण माहिती प्रभावीपणे मांडली. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतल्याने आपले विचार विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पटवून सांगितले. विविध उदाहरणातून विविध सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले.
या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गिरीष रमणलाल भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निबंध व वक्तृत्व समिती प्रमुख अंजली बोरसेपाटील व राजश्री भदाणे मॅडम तसेच मराठी विभाग प्रमुख अपर्णा यावलकर , दिपक वाघ, दिवाकर साबळे, जितेंद्र पाटील त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत उत्साहाने सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळाले. संजय पिले, जे जी पोळ , योगेश चौधरी, किशोर सोनवणे, कीर्तीकुमार शेलकर यांनी मोलाचे सहकार्य केले
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व वक्तृत्वकौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
प्रभारी मुख्याध्यापक
स्काऊट शिक्षक
रावसाहेब रूपचंद विद्यालय जळगाव
9890576589

















