
जळगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर यांच्या वतीने दिनांक ४ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी उद्यान येथे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेत आर. आर. विद्यालयातील चित्रकला स्पर्धेसाठी ४० विद्यार्थी, तर वक्तृत्व स्पर्धेसाठी ९ विद्यार्थी सहभागी झाले. चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेसाठी सामाजिक व राष्ट्रीय विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना, भावना व सामाजिक तसेच राष्ट्रीय विषयांवरील विचार चित्रकलेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळावी, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सुंदर, कल्पक व आशयपूर्ण चित्रे साकारून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. वक्तृत्व स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग घेत विविध सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले.
या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक गिरीष रमणलाल भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कलाशिक्षक वाय. बी. न्हासदे सर तसेच कलाप्रमुख ए. एन. सपकाळे सर उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेत उत्साहाने सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळाले. संजय पिले, जे जी पोळ , योगेश चौधरी, किशोर सोनवणे, कीर्तीकुमार शेलकर यांनी मोलाचे सहकार्य केले
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व वक्तृत्वकौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
प्रभारी मुख्याध्यापक
स्काऊट शिक्षक
रावसाहेब रूपचंद विद्यालय जळगाव
9890576589
















