TheClearNews.Com
Friday, November 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विमा घोटाळ्याचे बिंग फुटू नये म्हणून घडवले हत्याकांड

हत्या करणारे तिघे पोलिसांकडून निष्पन्न , कारागृहात सात जणांची कसुन चौकशी

vijay waghmare by vijay waghmare
November 27, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – विमा घोटाळ्याचे रॅकेट उघडकीस येवून बिंग फुटू नये म्हणून एरंडोल येथील पाच जणांची बोरडोली येथील कालव्यात बुडवून हत्या करण्यात आली. मार्च महिन्यात दाखल झालेल्या वीमा घोटाळ्याच्या गुन्ह्यात विमा एजंट एजंटचा भाऊ हा या हत्याकाडांतील मुख्य सूत्रधार आहे. सुरत पोलिसांनी हत्याकांडातील अन्य तिघे आरोपीना निष्पन्न केले असून त्यांचा कसून शोध सुरु आहे. तसेच मेहुणबारे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या वीमा घोटाळ्याच्या दोन्ही गुन्ह्यात असलेल्या सात आरोपींना शुक्रवारी अटक करुन त्यांची या गुन्ह्यांच्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीत कसून चौकशी केली जाणार आहे.

एरंडोल येथे राहणारे नितीन उर्फ नितेश हिंमत पाटील हे कविता संजय पाटील त्यांचा मुलगा प्रथमेश पाटील यांना एका कारमध्ये बसवले, तर नितीन यांचा दुसरा मुलगा करण पाटील आणि तक्रारदार विवाहित मुलगी खुशी संजय पाटील हिची दोन मुले स्वीटी आणि हरीश यांना કુસુ दुसऱ्या कारमध्ये बसवले. दि. २१ नोव्हेंबर रोजी कारने सुरतच्या दिशेने निघाले होते. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ पोहोचले असता, दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांची गाडी अडवली आणि सर्वांना उकाई डाव्या कालव्यात फेकून दिले होते.

READ ALSO

पुण्यातील भीषण अपघातात जळगावची विद्यार्थीनी ठार

महावितरणच्या जळगाव परिमंडलात संविधान दिन साजरा

कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह सोमवारी कालव्यातून नितीन ऊर्फ नितेश उर्फ भुऱ्या पाटील, कविता पाटील आणि नितीन यांची नात स्वीटी यांचे मृतदेह मिळून आले होते. तर अन्य दोघांचा शोध सुरु असतांना गुरुवारी दोन वर्षाचा प्रथमेश याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला असून हरिष हा अद्याप बेपत्ता आहे.

बिंग फुटू नये म्हणून घडविले हत्याकांड

बारडोली येथे घडलेल्या पाच जणांच्या हत्याकांडाचे धागेदोरे हे मेहुणबारे विमा घोटाळ्यापर्यंत पोहचले असून त्या अनुषंगाने देखील सुरत पोलिसांकडून या दिशेने तपास केला जात आहे. विमा घोटाळ्याचे अन्य ठिकाणाचे बिंग फुटून मोठे मासे अडकणार असल्यामुळेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येण्याची शक्यता आहे.

जळगावसह सुरत पोलिसांकडून तिघांचा शोध

1 मार्च महिन्यात दाखल झालेल्या साडेसात कोटी रुपयांच्या विमा घोटाळ्यातील १२ संशयितांपैकी सात जणांना अटक करण्यात आली असून संभाजी पाटील, सुखदेव पवार व पवार यांच्यासह अन्य एक जण अद्याप फरार आहे. दरम्यान, बारडोली येथील हत्याकांडात वाहन चालकाला अटक करण्यात आली असून अन्य तिघे देखील फरार आहे. हे हत्याकांड फरार असलेल्यांनीच घडवून आणल्याचा पोलिसांना दाट संशय असून त्यांचा देखील कसून शोध घेतला जात आहे.

दोन्ही गुन्ह्यातील सात संशयितांना घेणार ताब्यात

नैसर्गिक मृत्यूला अपघाती मृत्यूचा बनाव करुन विविध कंपन्यांकडून साडेसात कोटी रुपयांचा लाटल्याप्रकरणी मार्च २०२६ मध्ये मेहुणबारे पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी देखील अशाच प्रकरणे १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांमधील न्यायालयीन कोठडीत असलेले प्रेमचंद त्र्यंबक पाटील, प्रवीण मयाराम पाटील, डॉ. मंदार करंबेळकर याच्यासह पोलीस अंमलदार रविंद्र बत्तीसे, महेंद्र पाटील, सचिन निकम, सुनिल निकम हे सात संशयितांचा दोन्ही गुन्ह्यात समावेश आहे. त्या सातही जणांना दुसऱ्या गुन्ह्यात गुरुवारी अटक केली जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMurder orchestrated to prevent exposure of an insurance scam

Related Posts

गुन्हे

पुण्यातील भीषण अपघातात जळगावची विद्यार्थीनी ठार

November 27, 2026
जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात संविधान दिन साजरा

November 26, 2026
जळगाव

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

November 26, 2026
जळगाव

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

November 26, 2026
गुन्हे

बारडोली येथे पाच जणांना कालव्यात फेकल्याच्या घटनेचे मेहुणबाऱ्यापर्यंत धागेदोरे

November 26, 2026
गुन्हे

रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला घरफोडीचा आरोपी जेरबंद; दोन दिवसांत गुन्ह्याची उकल !

November 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सन्मानचिन्ह म्हणजे आयुष्य योग्य मार्गाने जगण्याची प्रेरणा : गनी मेनन !

February 25, 2024

आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी

April 23, 2021

ग्रामविकासासाठी सरपंचाचे सर्वांगीण विचार करावा : अनिकेत पाटील

September 20, 2022

धक्कादायक ! तरुणीवर सहा जणांकडून बलात्कार नंतर मैत्रिणीलाही बोलावून केला अत्याचार

April 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group