TheClearNews.Com
Thursday, November 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बारडोली येथे पाच जणांना कालव्यात फेकल्याच्या घटनेचे मेहुणबाऱ्यापर्यंत धागेदोरे

vijay waghmare by vijay waghmare
November 26, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) – येथे राहणारे नितीन उर्फ नितेश हिंमत पाटील हे कविता संजय पाटील त्यांचा मुलगा प्रथमेश पाटील यांना एका कारमध्ये बसवले, तर नितीन यांचा दुसरा मुलगा करण पाटील आणि तक्रारदार विवाहित मुलगी खु शी संजय पाटील हिची दोन मुले स्वीटी आणि हरीश यांना दुसऱ्या कारमध्ये बसवले. दि. २१ नोव्हेंबर रोजी कारने सुरतच्या दिशेने निघाले होते. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ पोहोचले असता, दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांची गाडी अडवली आणि सर्वांना उकाई डाव्या कालव्यात फेकून देण्यात आले.

तिघांचे मृतदेह सापडले तर दोघे बेपत्ता घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी कालव्यात शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान महुवा तालुक्यातील डुंगरी गावाजवळ उकाई-काकरापार डाव्या कालव्यात एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचे मृतदेह आढळून आले. नातेवाईकांनी ओळख पटवल्यानंतर हे मृतदेह नितीन ऊर्फ नितेश उर्फ भुऱ्या पाटील, कविता पाटील आणि नितीन यांची नात स्वीटी हिचे असल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या पतीच्या निधनानंतर कविता पाटील

READ ALSO

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला घरफोडीचा आरोपी जेरबंद; दोन दिवसांत गुन्ह्याची उकल !

या नितीन पाटील यांच्यासोबत राहत होत्या. या घटनेत नितीन यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रथमेश आणि नातू हरीश हे दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

कालव्यात फेकण्याचे कारण काय?

बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडियो, आभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबावर हल्ला करून त्यांना कालव्यात फेकण्यामागे नेमके कारण काय, आरोपी आणि पीडित कुटुंब एकमेकांना आधीपासून ओळखत होते का, तसेच यामागे काही जुने वैर वैर होते का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

५० लाखांचा क्लेम, १० लाख काढले

कालव्यात फेकून हत्या केलेल्या मयत नितीन उर्फ नितेश पाटील व कविता पाटील हे दोघ गेल्या आठ दिवसांपुर्वी दि. १९ रोजी मेहुणबारे पोलीस ठाण्यात ५० लाख रुपयांचा विमा घोटाळाप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित होते. या घोटाळ्यात कविता पाटील यांनी पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचे भासवित पोलिसांसह वैद्यकीय अधिकारी व विमा एजंटच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार करुन ५० लाख रुपयांचा विमा क्लेम दाखल केला होता. तसेच कविता पाटील यांनी विमा कंपनीच्या डेबीट कार्डद्वारे दहा लाख रुपये काढल्याचे तक्रारीत नमूद होते.

सात आठ वर्षापुर्वी सोडले नितीनने जळगाव

कालव्यात मृतदेह आढळलेला नितीन (नितेश) उर्फ भुऱ्या हा या पूर्वी जळगावात रिक्षा चालवत होता. सात ते आठ वर्षांपूर्वी त्याने जळगाव सोडले. सध्या त्याचे वडील हिंमत पाटील व आई वंदना पाटील हे जळगावातील खंडेराव नगर परिसरात राहतात. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते सुरतकडे रवाना झाले आहे. तसेच नितीनची आत्यासह एक भाऊ जळगावात रात असून ते देखील घटनेची माहिती मिळताच सुरतच्या दिशेने रवाना झाले आहे.

विमा घोटाळा गुन्ह्याच्या कनेक्शनचा शोध

मेहुणबारे पोलीस ठाण्यात विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या तक्रारीवरुन नितीन उर्फ नितेश पाटील व कविता पाटील यांच्यासह पोहेकॉ रविंद्र एकनाथ बत्तीसे, सचिन अशोक निकम, सुनिल अशोक निकम, महेंद्र प्रकाश पाटील या चार बडतर्फ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सुरत येथे झालेल्या हत्येचा आणि विमा घोटाळा प्रकरणी दाखल गुन्ह्यांचा एकमेकांसोबत काही संबंध आहे का? याचा जळगाव व गुजरात पोलिसांकडून शोध घेत आहे. तसेच या घटनेच्या तपासाकरीता काही मदत लागल्यास सुरत पोलिसांना सहकार्य केले जाणार असल्याची माहिती अपर पोली सअधीक्षक संदीप गावित यांनी दिली.

वाहन चालकाची भुमिका संशयास्पद

नितीन उर्फ नितेश पाटील आणि कविता पाटील यांच्यासह चार जणांना सुरत येथे चांगले काम मिळवून देतो असे सांगून वाहनचालक दयानंद भदाणे उर्फ खंड्या (रा. पारोळा) हा त्यांना सुरत येथे घेवून जात होता. परंतू रस्त्यात त्यांची निघृर्ण हत्या झाली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चालक दयानंद उर्फ खंड्या भदाणे याला पारोळा येथून ताब्यात घेत गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले. या गुन्ह्यात चालकाची भूमीका देखील संशयास्पद वाटत असल्याने त्याच्या चौकशीनंतर अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Erandolhas links reaching as far as Mehunbare.The incident in Bardoliwhere five people were thrown into a canal

Related Posts

जळगाव

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

November 26, 2026
गुन्हे

रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला घरफोडीचा आरोपी जेरबंद; दोन दिवसांत गुन्ह्याची उकल !

November 26, 2026
जळगाव

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद

November 25, 2026
गुन्हे

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

November 25, 2026
गुन्हे

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 25, 2026
अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
Next Post

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

October 22, 2021

मंत्रिमंडळ निर्णय : महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

September 8, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २४ मार्च २०२३ !

March 24, 2023

‘आमदार सांस्कृतिक महोत्सव’ आजपासून रंगणार !

August 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group