TheClearNews.Com
Wednesday, November 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद

vijay waghmare by vijay waghmare
November 25, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या २०२६-२७ च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाने वर्चस्व गाजवत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. तर पुणे-बारामती व नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाना स्पर्धेतील उपविजेतेपद विभागून देण्यात आले. यावेळी महावितरणचे संचालक राजेंद्र पवार (मानव संसाधन) व कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे(भा.प्र.से) यांच्या हस्ते अजिंक्यपदाचा करंडक विजेत्या संघास देण्यात आला.

महावितरणच्या कोल्हापूर येथे दि.२१ नोव्हेंबरपासून साधेपणाने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप मंगळवारी (दि. २४) सायंकाळी पोलीस ग्राऊंड, कसबा बावडा येथे झाला. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, नागपूर प्रादेशिक संचालक(प्रभारी) राजेश नाईक, मुख्य अभियंते पंकज तगलपल्लेवार, धर्मराज पेठकर, दत्तात्रय बनसोडे, दिलीप दोडके, संजय पाटील, हरीश गजबे, अरविंद बुलबुले, स्वप्नील काटकर, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील १२४६ खेळाडूपैकी ४०१ महिला व ८४५ पुरुष खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांना करंडक व सुवर्ण/रौप्य/कांस्य पदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले. सूत्रसंचालन रामगोपाल अहिर, बाजीराव आबिटकर व सुरेश पाटील यांनी केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर यांनी आभार मानले.

 

सांघिक खेळांचे अंतिम निकाल – अनुक्रमे विजेता व उपविजेता :

 

क्रिकेट – कल्याण-रत्नागिरी व छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर, व्हॉलिबॉल- कोल्हापूर व पुणे-बारामती, कबड्डी- पुरुष – मुख्य कार्यालय-भांडूप व पुणे-बारामती, महिला- मुख्य कार्यालय-भांडूप व पुणे-बारामती, खो-खो- पुरुष- पुणे-बारामती व कोल्हापूर, महिला- मुख्य कार्यालय-भांडूप व कोल्हापूर, टेबल टेनिस – पुरुष- छत्रपती संभाजीनगर-नांदेड- लातूर व नाशिक-जळगाव, महिला- नागपूर-गोंदिया-चंद्रपूर व कोल्हापूर, बॅडमिंटन – पुरुष- पुणे-बारामती व कल्याण-रत्नागिरी, महिला- कोल्हापूर व नागपूर-गोंदिया-चंद्रपूर, कॅरम – पुरुष- छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर व नागपूर-गोंदिया-चंद्रपूर, महिला- नागपूर-गोंदिया-चंद्रपूर व कल्याण-रत्नागिरी, ब्रिज – नागपूर-गोंदिया-चंद्रपूर व कोल्हापूर, टेनिक्वाईट- महिला- कोल्हापूर व नागपूर-गोंदिया-चंद्रपूर, कुस्ती – कोल्हापूर व पुणे बारामती, पॉवर लिफ्टिंग – नाशिक-जळगाव व नागपूर-गोंदिया-चंद्रपूर, शरीरसौष्ठव – कोल्हापूर व कल्याण-रत्नागिरी

 

वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल- अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पुढीलप्रमाणे :

 

१०० मीटर धावणे – पुरुष – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), शुभम निंबाळकर (कोल्हापूर) व चंद्रशेखर हेमने (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर), महिला – प्रिया पाटील (मुख्य कार्यालय-भांडूप), भारती राऊत (कल्याण-रत्नागिरी),संजना शेजाळ (पुणे-बारामती), २०० मीटर धावणे- पुरुष – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), चंद्रशेखर हेमने (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर) व साईनाथ मसणे (मुख्य कार्यालय -भांडूप), महिला – प्रिया पाटील (मुख्य कार्यालय-भांडूप), मेघा जुनघरे (कल्याण-रत्नागिरी) व आसावरी जाधव (पुणे-बारामती), ४०० मीटर धावणे- पुरुष – प्रतिक वाईकर (पुणे-बारामती), चंद्रशेखर हेमने (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर) व अथर्व कोळी (कोल्हापूर), महिला – रागिनी बेले (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर), भक्ती लोमटे (पुणे-बारामती) व स्नेहल धारवे (कोल्हापूर), ८०० मीटर धावणे- पुरुष – भाविक भौईर (मुख कार्यालय भांडूप), परेश चौधरी (नाशिक-जळगाव) व चंद्रशेख हेमने (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर), महिला – प्रिया पाटील (मुख्य कार्यालय-भांडूप), संजना शेजाळ (पुणे- बारामती) व स्वाती दमाहे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), १५०० मीटर धावणे- पुरुष – एकनाथ घंगाळे (नाशिक-जळगाव), अथर्व कोळी (कोल्हापूर) व हर्षल बोंडरे (पुणे-बारामती), महिला – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप), संजना शेजाळ (पुणे-बारामती) व रागिनी बेले (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर), ५००० मीटर धावणे- पुरुष – एकनाथ घंगाळे (नाशिक-जळगाव), आल्हाद निस्ताने (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर) व निवास धनगर (कोल्हापूर), ४ बाय १०० रिले – पुरुष – शुभम निंबाळकर, अथर्व कोळी, वैभव माने, प्रदिप वंजारे (कोल्हापूर), विराज कोथमकर, भाविक भोईर, रुपेश सकपाळ, साईनाथ मासणे (मुख कार्यालय भांडूप), गमेरसिंग वसावे, एकनाथ घांगले, रोशन बागुल, छगन भुरे (नाशिक-जळगाव), महिला – संजना शेजाळ, प्रिती गायकवाड, तेजस्विनी सोनोने, आशावरी जाधव (पुणे-बारामती), मेघा जुनघरे, संपदा कोत्रे, भारती राऊत, अरशिया शेख (कल्याण-रत्नागिरी), स्वाती दमाहे, रागिनी बेले, संगिता फुंडे, वेदश्री सोनावने (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर)

 

गोळा फेक – पुरुष – प्रवीण बोरावके (पुणे-बारामती), इम्रान मुजावर (कोल्हापूर) व दिपक पाटील (नाशिक-जळगाव), महिला – पूजा ऐनापुरे (कोल्हापूर), प्रियांका शेळके (नाशिक-जळगाव) व हर्षला मोरे (कल्याण-रत्नागिरी), थाळी फेक- पुरुष – धर्मेंद्र पाटील (नाशिक-जळगाव), इम्रान मुजावर (कोल्हापूर) व शरणजीत पुजारी (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), महिला – ज्योती कांबळे (कोल्हापूर), हिना कुराने (पुणे-बारामती) व प्रियंका शेळके (नाशिक-जळगाव), भाला फेक – पुरुष – सचिन चव्हाण (कोल्हापूर), भरत उकलकर (नाशिक-जळगाव) व मिलिंद डाफळे (कल्याण-रत्नागिरी), महिला – सरिता सरोटे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), मनीषा साबळे (पुणे-बारामती) व हर्षला मोरे (कल्याण-रत्नागिरी), लांब उडी – पुरुष – शुभम निंबाळकर (कोल्हापूर), निलेश वैद्य (अकोला-अमरावती), व अक्षय केंगळे (पुणे-बारामती), महिला – भारती राऊत (कल्याण-रत्नागिरी), प्रिया पाटील (मुख्य कार्यालय-भांडूप) व सरिता सरोटे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), उंच उडी – पुरुष – सतीश पाटील (कोल्हापूर), समीर मन्सुरी (नाशिक-जळगाव) व निवास जाधव (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), महिला – सोनाली मोरे (मुख्य कार्यालय-भांडूप), सुप्रिया जोगडे (अकोला-अमरावती), व अश्विनी देसाई (कोल्हापूर),

 

बुद्धिबळ – पुरुष – राहुल कुरवे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), संदिप बागुल (नाशिक-जळगाव), महिला – अमृता जोशी (मुख्य कार्यालय-भांडूप) व श्रेया राऊत (अकोला-अमरावती), कॅरम- पुरुष – सुमित पाटील (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), अंकित बैसारे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), महिला – पुष्पलता हेडाऊ (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर) व मनिषा चौकसे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), टेनिक्वाईट- महिला एकेरी – पुनम वाघाडे (अकोला-अमरावती), पुजा ऐनापुरे (कोल्हापूर), कुस्ती- ५७ किलो – सुदर्शन पाटील (कोल्हापूर), व शरद मोकले (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), ६१ किलो – अश्विन म्हाटे (पुणे-बारामती) व विवेक रावटे (कोल्हापूर), ६५ किलो – राजकुमार काळे (पुणे-बारामती) व सुर्यकांत गायकवाड (नाशिक-जळगाव), ७० किलो- विनोद गायकवाड (अकोला-अमरावती) व सचिन पाटील (नाशिक-जळगाव), ७४ किलो- स्वप्निल गावडे (पुणे-बारामती) व गुरुप्रसाद देसाई (कोल्हापूर), ७९ किलो- संदिप सावंत (कोल्हापूर) व अकिल मुजावर (पुणे-बारामती), ८६ किलो- ज्योतिबा ओऊळकर (कोल्हापूर) व सुनिल महाडिक (नाशिक-जळगाव), ९२ किलो- अमोल गवळी (पुणे-बारामती) व शिवाजी कोळी (कोल्हापूर), ९७ किलो- हणमंत कदम (कोल्हापूर), महेश कोळी (पुणे-बारामती), १२५ किलो – प्रमोद ढेरे (कोल्हापूर), चंद्रकांत बागवाल (पुणे- बारामती), शरीरसौष्ठव – ६५ किलो- सुनीलकुमार नन्हेट (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) व रोशन गायकवाड (कल्याण- रत्नागिरी), ७० किलो – अमित पाटील (कोल्हापूर) व गोपाल कुलकर्णी (कल्याण- रत्नागिरी), ७५ किलो- शुभम निंबाळकर (कोल्हापूर) व राजेंद्र जाधव (कल्याण-रत्नागिरी), ८० किलो- प्रविण घुणके (कोल्हापूर), समाधान मस्के (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), ९० किलो – राहुल कांबळे (कोल्हापूर), सौरभ पाटील (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), १०० किलो – सागर खंडारे (कोल्हापूर) व मोहम्मद अन्वर (अमरावती-अकोला)

 

पॉवर लिफ्टिंग – ५९ किलो- रवी मिरगणे (छत्रपती संभाजीनगर-नांदेड- लातुर), व दीपक गांगुर्डे (नाशिक-जळगाव) ६६ किलो – तेजस आभाळे (अकोला-अमरावती) व राजेंद्र राठोड (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), ७४ किलो – आयुष नंदागवळी (नाशिक-जळगाव) व सागर जगताप (कोल्हापूर), ८३ किलो – दिनेश धाडे (नाशिक- जळगाव) व महेश सावरकर (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर), ९३ किलो – महेश इंगोले (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर) व योगेश रहाटे (कल्याण-रत्नागिरी), १०५ किलो- श्रीकृष्ण इंगोले (नागपूर- गोंदिया-चंद्रपूर) व प्रसाद हिरे (नाशिक-जळगाव)

 

टेबल टेनिस – पुरुष एकेरी– अतुल दंडवते (पुणे-बारामती) व किरणकुमार पवार (छत्रपती संभाजीनगर-नांदेड- लातुर), पुरुष दुहेरी- रोहन श्रीरामवार -किरणकुमार पवार (छत्रपती संभाजीनगर-नांदेड- लातुर) व विजय चव्हाण-मंगेश प्रजापती (नाशिक-जळगाव), महिला एकेरी – स्नेहल बढे (अकोला-अमरावती) व अमृता गुरव (पुणे-बारामती), महिला दुहेरी- मनिषा बुरांडे- स्नेहल बढे (अकोला-अमरावती) व अपर्णा महाडिक-विजया माळी (कोल्हापूर), बॅडमिंटन – पुरुष एकेरी – भारत वशिष्ठ (पुणे-बारामती) व इम्रान तासगावकर (कोल्हापूर), पुरुष दुहेरी- भरत वसिष्ठ-पंकज पाठक (पुणे-बारामती) व मनिष कोठाणे-जॉन कोशी (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), महिला एकेरी – ऋतिका नायडू (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) व चैत्रा पै (कोल्हापूर), महिला दुहेरी- ऋतिका नायडू-रिना सागदेव (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) व चैत्रा पै-विदुला पाटील (कोल्हापूर) ब्रिज-जोडी – विजय पाटील-तेजस शहा (कल्याण-रत्नागिरी) व ब्रजेश गुप्ता-प्रशांत झाडे (अकोला-अमरावती), कॅरम पुरुष दुहेरी – गणेश कस्तुरे-संजय कांबळे (पुणे-बारामती) व अंकित बैसारे-इम्रान शेख (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) कॅरम महिला दुहेरी – पु्ष्पलता हेडाऊ-मनीषा चौकसे (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) व पूजा पाटील-तेजश्री गायकवाड (मुख्य कार्यालय भांडुप) टेनिक्वाईट महिला दुहेरी – प्रतिमा भालेराव-भाग्यश्री कदम (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर) समिधा लोहरे-नेहा हेमने (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर)

 

वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (४५ वर्षांवरील) – अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पुढीलप्रमाणे-

 

टेनिक्वाईट एकेरी महिला – प्रतिमा भालेराव (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), स्वाती देशमुख (मुख्य कार्यालय भांडुप) टेबल टेनिस पुरुष एकेरी – अतुल दंडवते(पुणे-बारामती), किरणकुमार पवार(छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), टेबल टेनिस महिला एकेरी – स्नेहल बढे(अकोला-अमरावती), अमृता गुरव(पुणे-बारामती), टेबल टेनिस पुरुष सांघिक – रितेश सव्वालाखे, अतुल बोकाळे, आशिष मानकर (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर) व विशाल नंदगावे, स्वप्नील गोटमारे, भुजंग खंदारे (मुख्य कार्यालय भांडुप). टेबल टेनिस महिला सांघिक – पुनम रोकडे, गीता काळे, सारिका साळोखे, (कोल्हापूर) व अर्चना मोरे, विद्या पाटील, सुषमा हजारे (नाशिक जळगाव), बॅडमिंटन पुरुष एकेरी – अविनाश जाधव (मुख्य कार्यालय भांडुप), राहुल मुळे (छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लातूर), बॅडमिंटन महिला एकेरी – विशाखा गायकवाड (कल्याण-रत्नागिरी), सुप्रिया वस्त्रद (पुणे-बारामती), बॅडमिंटन पुरुष दुहेरी – संजय गोताड-परिक्षित उदगावे (कोल्हापूर) व संजय पाटील-नितीन सांगोले (नागपूर-गोंदिया-चंद्रपूर), बॅडमिंटन महिला दुहेरी – कमलरुख दारूखनवाला-रशमी पांडे (मुख्य कार्यालय भांडुप) व पुनम रोकडे-गिता काळे (कोल्हापूर)

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonKolhapur Circle team wins the championship at the MSEDCL state-level sports tournament

Related Posts

गुन्हे

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

November 25, 2026
गुन्हे

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 25, 2026
अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
धरणगाव

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

November 24, 2026
गुन्हे

भरदिवसा वृद्धेवर हल्ला; १० हजारांची लूट करून संशयित फरार

November 24, 2026
कोर्ट

अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

November 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर सहा गाड्यांची जोरदार टक्कर, अपघातात तिघांचा मृत्यू

October 18, 2021

नाभिक समाज विकास मंडळाद्वारे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

September 5, 2021

गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉ.गुरुमुख जगवाणी यांचे मंत्री ना.जयंत पाटलांना साकडे !

February 14, 2021

‘राज्यात रात्रीच्या संचारबंदीबाबत सरकार विचाराधीन’ : आरोग्यमंत्री राजेश टोपे

August 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group