जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील संशयित धरम सांखलाच्या जामीन अर्जावरील युक्तिवादाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज सुजित वाणीच्या जामीन अर्जावर काही कारणास्तव निकाल येऊ शकला नाही.
आरोपी विवेक ठाकरे याच्या शिक्रापूरच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. दुसरीकडे डेक्कनच्या गुन्ह्यात सुजित वाणीच्या जामीन अर्जाबाबत आज आणि मंगळवारी विवेक ठाकरे आणि सीए महावीर जैन यांच्या जामीन अर्जावर न्यायालय आदेश देणार होते. परंतू काही कारणास्तव सुजित वाणीच्या जामीन अर्जावर निकाल येऊ शकला नाही. दरम्यान, सांखलाचे वकील अॅड.एस.के.चव्हाण यांनी बीएचआर घोटाळ्याशी सांखला यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगीतले. दुसरीकडे सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण हे आपला युक्तिवाद उद्या (मंगळवार) सादर करणार आहेत. तर डेक्कनच्या गुन्ह्यात सुजित वाणी, विवेक ठाकरे आणि सीए महावीर जैनच्या जामीन अर्जावर न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.